अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच “आज रात्री काहीतरी मोठं होणार आहे” असा इशारा दिला होता. त्यानंतर या बॉम्बर्सच्या हालचालीमुळे त्या वक्तव्याला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेचे लक्ष्य इराणमधील महत्त्वाचे रेल्वे पूल, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वीज प्रकल्प असू शकतात. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
advertisement
माहितीनुसार या मोहिमेसाठी अमेरिकन लष्कराने सर्व तयारी पूर्ण केली असून अंतिम आदेशाची प्रतीक्षा सुरू आहे. जर हा हल्ला झाला तर मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर विनाश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे केवळ इराणच नव्हे तर संपूर्ण प्रदेशातील सामरिक समीकरणे बदलू शकतात.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले असून ट्रम्प आपल्या इशाऱ्याला प्रत्यक्षात उतरवणार का? याबाबत तीव्र उत्सुकता आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
