TRENDING:

'हिरो बनायचं होतं, खिशात पैसे नव्हते तेव्हा तू...' अर्जुनची रिअल लाईफ सायलीसाठी स्पेशल पोस्ट

Last Updated:
Amit Bhanushali : ठरलं तर मगच्या अर्जुनची रिअल लाईफ सायली पाहिली का? अर्जुनने बायकोसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
advertisement
1/7
'हिरो बनायला खिशात पैसे नव्हते तेव्हा तू...' अर्जुनची रिअल लाईफ सायलीसाठी पोस्ट
'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. सायली म्हणजेच अभिनेत्री जुई वैयक्तिक आयुष्यात सिंगल आहे. मात्र अर्जुनचं लग्न झालं असून तो एका मुलाचा बाबा आहे. अर्जुनने त्याच्या रिअल लाईफ सायलीसाठी रोमँटीक, इमोशनल पोस्ट लिहिली आहे. अमितची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 
advertisement
2/7
श्रद्धा असं अमितच्या बायकोचं नाव आहे. अमित आणि श्रद्धा यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या खास निमित्ताने अमितने बायकोसाठी मनापासून एक पोस्ट लिहिली. अमित आणि श्रद्धा यांचं लव्ह मॅरेज आहे. डोंबिवली स्टेशनवर त्यांची भेट झाली होती.
advertisement
3/7
अमित तेव्हा 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत काम करत होता. श्रद्धा त्याला टीव्हीवर पाहत होती. दोघे ट्रेनमध्ये वेगवेगळ्या डब्ब्यांमध्ये चढले. घरी जाऊन श्रद्धाने अमितला फेसबुक शोधलं आणि त्याला मेसेज केला की त्याचं काम तिला आवडलं. या भेटीनंतर पंधरा दिवसांतच अमितने श्रद्धाला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचं लग्न झालं. आता त्यांच्या लग्नाला बारा वर्ष झाली आहेत. 
advertisement
4/7
लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं अमितने पोस्टमध्ये लिहिलंय, "2014  हिरो बनण्याचं स्वप्न होतं. तेव्हा खिशात पैसे नव्हते, पण मनात जिद्द मात्र कायम होती. या प्रवासात माझ्यासोबत होती माझी हिरोईन."
advertisement
5/7
"आज माझ्या हातात मला मिळालेल्या पुरस्कारांची ट्रॉफी आहे. पण खरं तेव्हाच जिंकलो होतो जेव्हा तू माझी जोडीदार म्हणून निवड केली होतीस.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा… माझ्या आयुष्याची खरी हिरोइन."
advertisement
6/7
संघर्षातून यशापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात अमितला त्याच्या बायकोची साथ मिळाली. अमितने याआधी देखील अनेकदा बायकोवरचं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. 
advertisement
7/7
अमितची पोस्ट समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हिरो बनायचं होतं, खिशात पैसे नव्हते तेव्हा तू...' अर्जुनची रिअल लाईफ सायलीसाठी स्पेशल पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल