TRENDING:

Farah Khan Cook Dilip: दिलीपचं झालं अप्रेझल! फराह खानने वाढवला कूकचा पगार, आकडा ऐकून कोपऱ्यात जाऊन रडाल

Last Updated:
Farah Khan Cook Dilip Salary: दिलीपचा पगार हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या पगाराबद्दल नेहमीच वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. नुकतंच, नव्या व्लॉगमध्ये फराह खानने दिलीपला त्याचा पगार वाढवणार असल्याचं सांगितलं. यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
1/10
फराह खानने वाढवला कूक दिलीपचा पगार, आकडा ऐकून कोपऱ्यात जाऊन रडाल
बॉलिवूडची फेमस डिरेक्टर फराह खान सध्या तिच्या फिल्म्सपेक्षाही तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे चर्चेत आहे. वेगवेगळ्या सेलेब्सच्या घरी जाऊन, त्यांच्याशी गप्पागोष्टी करत फराह खान खमंग पदार्थांचा आस्वाद घेते. मात्र, तिच्या व्लॉग्समध्ये फराहपेक्षाही तिचा कुक दिलीपची हवा पाहायला मिळते.
advertisement
2/10
फराह खानचा कुक दिलीप आता सामान्य कुक राहिला नसून तो आता सोशल मीडिया स्टार झाला आहे. फराह खानच्या व्लॉग्सना दिलीपमुळे एक वेगळाच टच मिळतो. त्या फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
advertisement
3/10
फराहच्या किचनमधून सुरू झालेला दिलीपचा प्रवास तिच्या व्लॉग्सपर्यंत पोहोचला आहे. दिलीप प्रत्येक व्लॉगमध्ये फराह खानकडे त्याचा पगार वाढवण्याची मागणी करताना दिसतो. नुकतंच, नव्या व्लॉगमध्ये फराह खानने दिलीपला त्याचा पगार वाढवणार असल्याचं सांगितलं. यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
advertisement
4/10
नुकतंच, फराह खान आणि दिलीप जॅकी श्रॉफ यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी जग्गू दादा आणि त्यांची लेक कृष्णा यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारल्या. मस्करीच्या ओघात फराहने दिलीपला विचारलं, "आता तुझा पगार वाढवून ५० हजार रुपये करायचा का?"
advertisement
5/10
कृष्णाचं हे बोलणं ऐकताच दिलीपचा चेहरा उजळला. त्याने निरागसपणे विचारलं, "काय, खरंच माझा पगार ५० हजार होणार?" फराहने यावर मिश्किल उत्तर दिलं असलं, तरी दिलीपचा हा आनंद पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
advertisement
6/10
दिलीपचा पगार हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या पगाराबद्दल नेहमीच वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. फराहने केवळ पगारच नाही, तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या कमाईतील एक ठराविक हिस्साही दिलीपला देण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
7/10
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दिलीप १० वर्षांपूर्वी काजोल आणि अजय देवगणच्या घराबाहेर फराहला भेटला होता. तिथे दिलीपचा भाऊ आधीच कुक म्हणून काम करत होता. फराहने त्याला २० हजार रुपयांवर कामाला ठेवलं आणि आज १० वर्षांत दिलीपनं आपल्या कामाचं सोनं केलंय.
advertisement
8/10
काही रिपोर्ट्सनुसार, दिलीपचा पगार १ लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. यामध्ये त्याच्या ऑनलाइन प्रसिद्धीचीही जोड आहे. अवघ्या २० हजारांपासून कामाची सुरुवात केलेल्या दिलीपने आपल्या मेहनतीने त्याचं मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे.
advertisement
9/10
दिलीपने आपल्या गावात ३ मजली आलिशान बंगला बांधला असून, विशेष म्हणजे त्यात स्विमिंग पूल देखील आहे. इतकंच नाही, तर पगार आणि यूट्यूबच्या कमाईतून दिलीपने गावी कित्येक एकर जमीनही खरेदी केली आहे.
advertisement
10/10
फराह खान आणि दिलीपचं नातं आता मालक आणि नोकराच्या पलिकडे गेलं आहे. फराहने तिच्या नोकराला एक स्टार केलं आहे. फराह यावरच थांबली नाही, तर तिने दिलीपवरचं सर्व जुनं कर्ज स्वतः फेडलं आणि त्याच्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याची पूर्ण जबाबदारी उचलली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Farah Khan Cook Dilip: दिलीपचं झालं अप्रेझल! फराह खानने वाढवला कूकचा पगार, आकडा ऐकून कोपऱ्यात जाऊन रडाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल