Donald Trump: पुढच्या 2 आठवड्यात काहीतरी मोठं घडणार, सकाळी 6.30 वाजता ट्रम्प यांनी फोडला बॉम्ब
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल इराण युद्धावर इराणला पुन्हा धमकी देत तेलसाठ्यांवर हल्ल्याचा इशारा दिला, कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली.
advertisement
1/6

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली. सकाळी 6.30 वाजता सर्वात मोठी घोषणा केली आणि त्यानंतर जगभराचं टेन्शन वाढलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या महायुद्धाच्या ठिणगीने आता रौद्र रूप धारण केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे.
advertisement
2/6
अमेरिकन लष्करी ताकद अजेय असल्याचं त्यांनी जगाला सांगितलं . "पुढील २ ते ३ आठवड्यांत आम्ही इराणवर असा प्रहार करू की ते देश म्हणून कित्येक दशकं मागे फेकले जातील," अशी गर्जना ट्रम्प यांनी केली आहे इराणमधील सत्ता बदलाबाबत बोलताना ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केलं.
advertisement
3/6
"इराणमध्ये सत्ता परिवर्तन करणं हा आमचा कधीच मुख्य उद्देश नव्हता, पण सध्याच्या परिस्थितीमुळे तिथली सत्ता उलथवून लावली गेली आहे," असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. इराणमधील सध्याच्या अस्थिरतेवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असल्याचंच त्यांनी यातून सूचित केलं आहे.
advertisement
4/6
इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या तेल क्षेत्रावर अमेरिकेने अद्याप मोठा हल्ला केलेला नाही. मात्र, ट्रम्प यांनी आता थेट इशारा दिला आहे की, "आम्ही आतापर्यंत इराणचे तेल साठे जाणीवपूर्वक वाचवले आहेत. पण जर आम्ही त्यांना लक्ष्य केलं, तर इराणचं तेल साम्राज्य पूर्णपणे नष्ट होईल." यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
5/6
इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या अमेरिकन जनतेला ट्रम्प यांनी आश्वस्त केलं आहे. "आज अमेरिका रशिया आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांच्या एकूण उत्पादनापेक्षा जास्त ऊर्जा उत्पादन करत आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ तात्पुरती आहे, लवकरच परिस्थिती सामान्य होईल," असा दावा त्यांनी केला.
advertisement
6/6
जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'होर्मुज जलडमरूमध्य बाबत ट्रम्प यांनी इतर देशांना कडक शब्दांत सुनावलं आहे. "होर्मुजचा मार्ग नैसर्गिकरित्या खुला होईल, पण त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आता इतर देशांना घ्यावी लागेल." "अमेरिका मदत करेल, पण नेतृत्व तुम्हालाच करावं लागेल." "जगातील इतर देशांनी आता स्वतःचं धाडस गोळा करावं आणि आपलं तेल अमेरिकेकडून खरेदी करावं," असं आवाहनही त्यांनी केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Donald Trump: पुढच्या 2 आठवड्यात काहीतरी मोठं घडणार, सकाळी 6.30 वाजता ट्रम्प यांनी फोडला बॉम्ब