TRENDING:

40 हून अधिक सीरियल्स, वयाच्या 50 व्या वर्षीही मेन रोल; सर्वाधिक परडे घेणारा मराठी मालिकेचा हा हिरो कोण?

Last Updated:
40 हून अधिक सीरियल्स, वयाच्या 50 व्या वर्षीही मेन रोल करणारा हिरो आज मालिका विश्वात सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आहे. सर्वाधिक परडे घेणारा मराठी मालिकेचा हा हिरो कोण?
advertisement
1/10
40 हून अधिक सीरियल्स, वयाच्या 50 व्या वर्षीही मेन रोल; सर्वाधिक परडे घेणारा मराठी मालिकेचा हा हिरो कोण?
मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक कलाकारांनी काम केलं आहे. अनेक कलाकारांनी टेलिव्हिजन गाजवलं आहे. त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांवर आहे. आजही अनेक अभिनेते, अभिनेत्री नव्याने टेलिव्हिजन क्षेत्रात दिसतात. टेलिव्हिजनवर काम करताना सर्वाधिक पैसे कोणत्या अभिनेत्याला मिळतात माहितीये?
advertisement
2/10
सध्या एक नाही 2-4 मराठी चॅनेल्स आहेत ज्यावर अनेक मालिका सुरू आहेत. ज्यात अनेक नवे चेहरे आहेत. तर अनेक जुने अभिनेते देखील हिरो म्हणून दिसत आहेत.
advertisement
3/10
सध्याच्या मराठी टेलिव्हिजनवर काम करणारा असा एक अभिनेता ज्याची क्रेझ वयाच्या 50 व्या वर्षीही कमी झालेला नाही. आतापर्यंत त्याने 40 हून अधिक मालिकांमध्ये काम केलं. पण आजही तो मेन रोल मध्ये दिसतोय.
advertisement
4/10
हा अभिनेता आज मराठी टेलिव्हिजनचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो स्क्रिनवर आला की प्रेक्षक चॅनेल चेंज करत नाहीत असं म्हटलं जातं.
advertisement
5/10
अभिनेत्यानं आजवर अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण छोट्या पडद्यावरची त्याची छाप कोणीही पुसू शकलं नाही. आजही त्याची मालिका TRP मध्ये टॉप 5 मध्ये आहे.
advertisement
6/10
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे सुबोध भावे. मराठी टेलिव्हिजनवर सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. अभिनेता सुबोध सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतोय.
advertisement
7/10
सुबोधचा मालिकांसाठीचा पर डे हा सर्वाधिक आहे. वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत सुबोध प्रमुख भूमिकेत आहे. याआधी त्याने चंद्र आहे साक्षीला, तुला पाहते रे, कुलवधू, कळत नकळत सारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
advertisement
8/10
सुबोधच्या सर्वाधिक मानधन घेण्याबाबत अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे हिनं एका मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, "टेलिव्हिजनचा तो अभिनेता किंवा अभिनेत्री त्या कॅलिबरचे असतील, तुम्ही होल्ड करू शकता स्क्रिन असे... म्हणजे सुबोध भावे."
advertisement
9/10
"खूप पैसे घेतो. त्याचा खूप मोठा परडे आहे.पण तो ते डिलिव्हर करतोय. तो जेव्हा स्क्रिनवर येतो तेव्हा ते प्रेक्षकांना बघावसं वाटतं. हेच कारण आहे."
advertisement
10/10
"जो माणूस स्क्रिन होल्ड करतो, जो माणूस त्याच्या कमाल अभिनयाने स्क्रिनवर जादू घडवतो, तो माणूस स्क्रिन आल्यावर चॅनेल चेंज करत नाही त्या माणसाला खूप पैसे मिळतात. मग ती स्त्री असो किंवा पुरूष असो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
40 हून अधिक सीरियल्स, वयाच्या 50 व्या वर्षीही मेन रोल; सर्वाधिक परडे घेणारा मराठी मालिकेचा हा हिरो कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल