Panchayat 5 OTT : 'पंचायत 5' ला ब्रेक? सुरू होताच थांबलं शूटिंग, नेमकं काय झालं? शॉकिंग कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
पंचायत 5 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेब सीरिजच्या शूटिंगलाही सुरुवात झाली पण शूटिंग सुरू होताच थांबलं. नेमकं काय घडलं?
advertisement
1/8

ओटीटी </a>विश्वात सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजेच पंचायत. ना कोणी सुपरस्टार ना कोणता झगमगाट. एका छोट्या गावातील गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. एक दोन नाही तर या सीझनचे तब्बल चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले." width="1000" height="1481" /> ओटीटी विश्वात सर्वाधिक गाजलेली वेब सीरिज म्हणजेच पंचायत. ना कोणी सुपरस्टार ना कोणता झगमगाट. एका छोट्या गावातील गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. एक दोन नाही तर या सीझनचे तब्बल चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले.
advertisement
2/8
आता या सीरिजचा पाचवा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे. पंचायत 5 ची काही महिन्यांआधीच घोषणा करण्यात आली. नुकतीच सीरिजच्या शूटिंगला देखील सुरूवात झाली. पण शूटिंग दरम्यानच सीरिजवर मोठं संकट कोसळलं.
advertisement
3/8
मध्यप्रदेशच्या सेहोर जिल्हा मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या महोदिया गावात 'पंचायत' वेब सीरिजच्या पाचव्या सीझनचं शूटिंग सुरू आहे. प्राइम व्हिडीओनं पंचायतला 6 वर्ष झाल्याच्या निमित्तानं फोटो शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली. पण शूटिंग दरम्यान मोठी समस्या निर्माण झाली आणि शूटिंग थांबवावं लागलं.
advertisement
4/8
गेल्या 24 तासांत हवामानात झालेल्या बदलांमुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी तंबू उखडले गेले आणि सेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मध्य प्रदेशातील हवामान सतत बदलत असून, त्यामुळे पाऊस आणि ऊन पडत आहे.
advertisement
5/8
राज्यात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस पडत असल्याचे वृत्त आहे. सेहोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचे वादळही झाले. अचानक दाट ढग आणि मुसळधार पावसामुळे थंडावा आला. सेहोर जिल्ह्यातील पावसामुळे 'पंचायत' वेब सीरिजच्या चित्रीकरणावर परिणाम झाला आहे.
advertisement
6/8
'पंचायत' वेब सीरिजचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. प्रोडक्शन टीम आता पावसात भिजलेले शेड सुकण्याची वाट पाहत आहे. सेट पूर्णपणे पाण्याने भिजले आहेत. शिवाय शूटिंगच्या बऱ्याच उपकरणांचे नुकसान झालं आहं. क्रू मेंबर्सना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
advertisement
7/8
'पंचायत' वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण चार सीझन प्रदर्शित झाले असून त्या सर्वांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सीरिज फुलेरा नावाच्या काल्पनिक गावावर आधारित स्टोरी आहे.
advertisement
8/8
पंचायत कार्यालयात काम करणारा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) ची गोष्ट आहे. रघुवीर यादव यांनी प्रधानच्या पतीची आणि नीना गुप्ता यांनी प्रधानची भूमिका साकारली आहे. चारही सीझनमध्ये सगळ्या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Panchayat 5 OTT : 'पंचायत 5' ला ब्रेक? सुरू होताच थांबलं शूटिंग, नेमकं काय झालं? शॉकिंग कारण