TRENDING:

Rashmika Pregnant : आता आम्ही तीन झालो! रश्मिका मंदानाने दिली Good News; विजय देवरकोंडाच्या कुटुंबात नवा पाहुणा?

Last Updated:
Rashmika Mandanna Pregnant : अभिनेत्री रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
advertisement
1/10
आता आम्ही तीन झालो! रश्मिका मंदानाने दिली Good News; विजय देवरकोंडाच्या कुटुंबात नवा पाहुणा?
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2025 ला लग्न केलं. उदयपूरमध्ये खासगी विवाहसोहळ्यात अगदी शाही थाटात त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा आला एक महिना झाला आहे, तोच त्यांनी आता गूड न्यूज दिली आहे.
advertisement
2/10
काही दिवसांपूर्वीच हे कपल हनीमूनसाठी थायलंडला गेलं होतं. तिथूनही त्यांनी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. त्यानंतर आता त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
3/10
रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने तिचा आणि विजयचा एक कार्टुन व्हिडीओ लावला आहेत, सोबत एक पिवळं फुल दाखवलं आहे. मुव्हिंग रेड हार्टही लावलं आहे.
advertisement
4/10
रश्मिकाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आम्ही दोनाचे तीन झालो असं म्हटलं आहे. जिथं तिने लाजणारा इमोजी आणि व्हाइट हार्ट लावला आहे. रश्मिकाची ही पोस्ट प्रेग्नन्सीची न्यूज देण्यासारखी आहे.
advertisement
5/10
रश्मिकाच्या या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. रश्मिका तू प्रेग्नंट आहेस का? तीन म्हणजे फूल आहे की तीन म्हणजे छोटा विरोश? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत.
advertisement
6/10
दरम्यान लग्नानंतर रश्मिकाच्या अनेक फिल्म्स येत आहेत. तिचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. ती 'ॲनिमल पार्क', 'पुष्पा 3', 'कॉकटेल 2' आणि 'मैसा' यांसारख्या अनेक फिल्मवर काम करत आहे.
advertisement
7/10
रश्मिकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत विजय दिसत असला तरी तिने तिची ही पोस्ट विजयच्या अकाऊंटला नाही तर 'टेरिबली टायनी पोस्ट' आणि 'रश्मिका अँड रू' नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला जोडली आहे.
advertisement
8/10
'रश्मिकारू' हे रश्मिकाचं आधीपासूनच असलेलं अकाउंट आहे, जे ती डायरीप्रमाणे सांभाळते. त्यावर ती छोट्या पण प्रभावी गोष्टी लिहिते.
advertisement
9/10
त्यामुळे रश्मिकाची ही पोस्ट आणि आता उन्हाळ्याची सुट्टी यामुळे रश्मिका मुलांसाठी एखादा कार्टुन शो किंवा काही सीरिज आणणार का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
advertisement
10/10
रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्याकडे प्रेग्नन्सीची न्यूज आहे असं थेट सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यांचे हे दोनाचे तीन म्हणजे नेमकं काय, खरंच रश्मिका प्रेग्नंट आहे की हे आणखी काही आहे. हे लवकरच समजेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Pregnant : आता आम्ही तीन झालो! रश्मिका मंदानाने दिली Good News; विजय देवरकोंडाच्या कुटुंबात नवा पाहुणा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल