TRENDING:

Sanjay Raut: संजय राऊतांनी मन जिंकलं, 'तो' समोर येताच खिशातून पैशांचं बंडल काढलं अन्...पुढे काय घडलं?

Last Updated:
Sanjay Raut: संजय राऊतांनी मन जिंकलं, 'तो' समोर येताच खिशातून पैशांचं बंडल काढलं अन्...पुढे काय घडलं? (विजय वाघमारे, प्रतिनिधी)
advertisement
1/8
 Sanjay Raut: संजय राऊतांनी मन जिंकलं, 'तो' समोर येताच खिशातून पैशांचं बंडल काढलं अन्...पुढे काय घडलं?
राज्याच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, आक्रमक शैली आणि परखड मतांसाठी शिवसेना खासदार संजय राऊत ओळखले जातात.अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात. मात्र आज त्यांची एक वेगळीच, संवेदनशील बाजू आज जळगावात पाहायला मिळाली.
advertisement
2/8
संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात ते वास्तव्यास होते. सकाळी आपला नियोजित दौरा पूर्ण करण्यासाठी ते विश्रामगृहातून बाहेर पडत असताना त्यांची नजर एका वृद्ध व्यक्तीवर पडली.
advertisement
3/8
शिरूभाऊ कासार असे या वृद्ध शिल्पकाराचे नाव. कासार हे सकाळपासूनच हातामध्ये लाकडापासून तयार केलेली एक सुंदर 'बैलजोडीची प्रतिकृती' घेऊन राऊत यांची भेट घेण्याच्या आशेने थांबले होते.
advertisement
4/8
साधारणपणे बडे नेते ताफ्यासह निघताना गर्दीत अशा सामान्य माणसांकडे दुर्लक्ष होते. मात्र, राऊत यांनी आपल्या वाहनातून ही बैलजोडी आणि ते वृद्ध शिल्पकार पाहिले अन् त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्याचा आदेश दिला
advertisement
5/8
वाहनातून उतरून राऊत थेट शिरूभाऊंकडे गेले. त्यांनी अत्यंत आस्थेने त्या कलाकृतीची विचारपूस केली. लाकडावर कोरलेली आणि सिरॅमिक पावडरचा वापर करून अत्यंत सुबकपणे साकारलेली ती बैलजोडी पाहून राऊत भारावून गेले. त्यांनी जेव्हा त्या प्रतिकृतीची किंमत विचारली, तेव्हा शिरूभाऊंनी ती साडेआठ हजार रुपये असल्याचे सांगितले.
advertisement
6/8
विशेष म्हणजे शिरूभाऊंनी स्वतःहून राऊत यांना सांगितले की, तुम्ही 500 रुपये कमी द्या, पण ही कलाकृती स्वीकारा." यावर राऊत यांनी कोणताही आढेवेढे न घेता, आपल्या जॅकेटच्या खिशातून 8 हजार रुपये काढले आणि शिरूभाऊंच्या हातात ठेवले. एखाद्या मोठ्या नेत्याने सामान्य कलाकाराची कला अशा प्रकारे सन्मानाने विकत घेतल्याने शिरूभाऊंचे डोळे पाणावले.
advertisement
7/8
नेहमी राजकीय टोलेबाजी आणि टीकेमुळे चर्चेत असणाऱ्या संजय राऊत यांच्या या कृतीने उपस्थित सर्वांची मने जिंकली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका कलाकाराच्या कलेला योग्य मोबदला देणे, यातून राऊत यांची 'हळवी' आणि 'दिलदार' बाजू समोर आली आहे.
advertisement
8/8
शिरूभाऊ कासार यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे केवळ त्या पैशांमुळे नव्हते, तर त्यांच्या कलेची दखल राज्याच्या एका बड्या नेत्याने घेतली, या भावनेमुळे होते. जळगावातील या छोट्याशा पण हृदयस्पर्शी प्रसंगाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sanjay Raut: संजय राऊतांनी मन जिंकलं, 'तो' समोर येताच खिशातून पैशांचं बंडल काढलं अन्...पुढे काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल