TRENDING:

Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार- रविवारी 'या' विभागांत राहणार पाणी पुरवठा बंद

Last Updated:

सिंहस्थ कुंभमेळा आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान नाशिकमध्ये येत्या दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये विकासकामांनी चांगलाच जोर धरला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत येणारे काम सध्या जोरदार सुरू आहे. या सर्व कामांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये, पाणी पुरवठा विषयक कामे हाती घेण्यात आलेले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पाणी पुरवठ्याविषयक महत्त्वाचे कामं हाती घेण्यात आलेले आहेत. काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार (दि. 4) आणि रविवार (दि. 5) रोजी पाण्याचा दोन दिवसांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. या काळामध्ये, संपूर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
News18
News18
advertisement

नाशिक शहरातील दोन दिवसांच्या शटडाउन कालावधीत विभागांप्रमाणे पाणी बंद राहणार आहे. नाशिक पूर्व विभागातील, प्रभाग क्रमांक 30 मधील कलानगर जलकुंभ भरणारी 500 मि.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनी मुख्य 700 मि.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी 24 तासांचा अवधी लागणार आहे. नाशिक पश्चिम विभागातील, त्र्यंबक रोड आणि एबीबी सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या 300 मि.मी. व्यासाच्या पाइपलाइन लिकेजचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, पी अॅन्ड टी कॉलनी येथे 200 मि.मी. व्यासाचा एअर व्हॉल्व्ह बदलणे, हे सर्व कामे पूर्ण होण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागणार आहे.

advertisement

याशिवाय, गांधी नगर आणि नाशिक रोड विभागामध्येही पाणीबंद राहणार आहे. नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रामध्ये रॉ वॉटर जाणाऱ्या 900 मी.मीच्या पाईपलाईनमधून क्रॉस कनेक्शन घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मक्तेदार पी.एल. आडके. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरील 900 मी.मीच्या पाईपलाईनवर आणि 1200 मी.मीच्या पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शनचे काम हाती घेण्यात आलेले आहेत. मक्तेदार पी. एल. आडके. गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट 700 मि.मी व्यासाच्या पाईपलाईनवर 450 मी.मी व्यासाच्या पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन करण्याते काम हाती घेण्यात आले आहेत. मक्तेदार पी. एल. आडके. गांधीनगर जलकुंभाजवळ 700 मि.मी व्यासाच्या पंपाच्या पाईपलाईनवर स्मार्ट सिटीमार्फत फ्लो मीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मित्राच्या शेतातून घेतलं पाणी, तरुणाने यशस्वी केली टोमॅटोची शेती, वर्षाला 7 लाख कमाई
सर्व पहा

वेगवेगळ्या क्षेत्रांतील पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाला अंदाजे 36 तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पंचवटी विभागातील पेठ रोड, सप्तरंग बिल्डिंग जवळ मखमलाबाद येथील ऊर्ध्ववाहिनीवर 600 मिमी व्यासाच्या तवली डोंगर येथील ऊर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे. मक्तेदार में. आशिष कन्स्ट्रक्शन, पेठरोड, आरटीओ ऑफिससमोर समर्थनगर नवीन जलकुंभाच्या ऊर्ध्ववाहिनीचे 600 मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या कनेक्शनसोबत क्रॉस कनेक्शन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मक्तेदार में. मेघ कन्स्ट्रवेल. पंचवटी प्रभाग. क्र. 6 कुसुमाग्रज गार्डनरजवळील गुरुत्ववाहिनीवरील लिकेज बंद करण्याचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे. पंचवटी विभागातील ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे 18 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार- रविवारी 'या' विभागांत राहणार पाणी पुरवठा बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल