IRGC पासून बचावासाठी पायलटचा प्रयत्न?
Tasnim News Agency च्या माहितीनुसार ही घटना पश्चिम इराणमधील कोहगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांताच्या आसपास घडली. अहवालानुसार IRGC च्या प्रगत संरक्षण प्रणालीने F-35 विमानाला लक्ष्य केले. त्यानंतर पायलटने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इजेक्ट केले आणि तो इराणी भूमीवर उतरला.
advertisement
यानंतर पायलटने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अमेरिकन सैन्याने आपल्या पायलटला इराणच्या सीमाबाहेर सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच इराणी सैन्याने त्याला पकडल्याचा दावा करण्यात आला आहे.
अधिकृत पुष्टी नाही
सध्या इराणी सैन्य किंवा सरकारकडून पायलट पकडल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र जर खरोखरच अमेरिकन पायलट पकडला गेला असेल तर हा अमेरिकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो. अशा परिस्थितीत इराण शांतता चर्चेत (peace talks) या घटनेचा दबाव म्हणून वापर करू शकतो.
F-35 पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा
IRGC च्या दाव्यानुसार, हे विमान ‘लेकनहीथ स्क्वाड्रन’चा भाग होते. जे अमेरिकेच्या सर्वात ताकदवान हवाई युनिट्सपैकी एक मानले जाते. F-35 हे अमेरिकेचे अत्याधुनिक आणि ‘अजेय’ मानले जाणारे लढाऊ विमान आहे. IRGC ने असा दावा केला आहे की त्यांनी पाडलेले हे दुसरे F-35 विमान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करणारे हे विमान पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे.
