TRENDING:

Aajache Rashibhavishya: खूप कष्ट केलं, आता तुमचा दिवस आला, शुक्रवारी या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा शुक्रवार संधी आणि आव्हाने घेऊन येईल. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
खूप कष्ट केलं, आता तुमचा दिवस आला, शुक्रवारी या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. आज काही कामामध्ये छोट्या मोठ्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला आज मदतीची गरज पडू शकते. त्यामुळे बिंदास मदत मागा. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या अडचणीचा सामना तुम्ही करत होता त्या अडचणीचं आज निवारण होईल. कुटुंबात आनंददायी वातावरण असेल, परंतु वेळ देणं महत्त्वाचं आहे.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस कभी खुशी तो कभी गम अश्या पद्धतीचा असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांचा सल्ला फायदाचा ठरू शकतो. एकला चलो रे भूमिका तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे योग्य ठिकाणी सल्ला महत्त्वाचा. कामाची धावपळ असेल. कुटुंबात वातावरण ठीक असेल.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला यश मिळणार असून अनेक संधी निर्माण होणार आहेत. त्या संधीचा योग्यवेळी फायदा उचला. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. प्रवासाचा योग आहे.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे कौतुक होईल. आज तुम्ही अनेकांच्या मदतीला धावून जाणार असून तुम्ही मदत केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. काही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. शक्यतो वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे पूर्ण होतील. परंतु यासाठी तुम्हाला कामांमध्ये फोकस आणि मेहनत असणे गरजेचे आहे. लव्हलाईफमध्ये सकारात्मक बदल होईल. प्रवासाचा योग आहे.
advertisement
7/13
आज तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो, परंतु खर्च करताना थोडी खबरदारी घ्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत नातेसंबंध मजबूत राहतील. त्यांच्यासोबत वेळ घालवणे आज फायदेशीर ठरेल. थोडा हलका व्यायाम करा, यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही ताजेतवाने राहाल.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारीमध्ये वाढ होईल. कोणत्या गोष्टीमध्ये अति घाई करू नका. अति घाई संकटात जाई, ही गोष्ट लक्षात ठेवा. जवळच्या व्यक्तीसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे.
advertisement
9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार उत्तम योग घेऊन येत आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या कामामध्ये यश मिळेल. नवीन संधी तुमच्याकडे चालून येतील. कुटुंबामध्ये काही कारणामुळे वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम महत्त्वाचा.
advertisement
10/13
मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्तम जाणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील, अनावश्यक खर्च टाळा. कामात प्रगती होईल, परंतु कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. प्रेमात काही गैरसमज होऊ शकतो, संयम ठेवा. थकवा जाणवू शकतो, विश्रांती घेणे आवश्यक आहे.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु आर्थिक निर्णय घेताना थोडी खबरदारी घ्या. कामात नवीन संधी निर्माण होतील. तुमचे कौशल्य वापरून फायदा मिळवा. मानसिक शांतता टिकवण्यासाठी ध्यान किंवा योगा करण्याचा प्रयत्न करा.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. आज तुम्ही कामामध्ये मग्न असाल. कामांमध्ये काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक ठिकाणी मान सन्मान वाढणार आहे. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: खूप कष्ट केलं, आता तुमचा दिवस आला, शुक्रवारी या राशींचं नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल