TRENDING:

Ajinkya Rahane : 'माझ्याविरुद्ध कट रचला जातोय...', KKR च्या दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचं खळबळजनक वक्तव्य! कुणाला केला आरोप?

Last Updated:

Ajinkya Rahane On Strike Rate : जी लोक कदाचित मॅच पूर्णपणे पाहत नाहीत किंवा त्यांच्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी विशिष्ट अजेंडा आहे, असं खळबळजनक वक्तव्य अजिंक्य रहाणे याने यावेळी केलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajinkya Rahane reply to jealous critics : आयपीएल 2026 च्या हंगामाला धमाकेदार अंदाजात सुरुवात झाली आहे. पण शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये केकेआरला पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबई इंडियन्स आणि आता हैदराबादने केकेआरला पराभवाचं पाणी पाजलंय. अशातच आता केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या स्ट्राईक रेटवरून देखील अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर अजिंक्य रहाणेने यावर खणखणीत उत्तर दिलंय.
Ajinkya Rahane KKR Captain IPL 2026
Ajinkya Rahane KKR Captain IPL 2026
advertisement

माझ्याविरुद्ध काहीतरी विशिष्ट अजेंडा - अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेने आपल्या बॅटिंगवर टीका करणाऱ्यांना आता सडेतोड उत्तर दिलं आहे. अज्जूने टीकाकारांकडे दुर्लक्ष करण्याचा आणि आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा पवित्रा घेतला असून, टीका करणाऱ्यांच्या हेतूबद्दलही शंका उपस्थित केल्याचं पहायला मिळतंय. रहाणेच्या मते, 2023 पासून त्याचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम राहिला आहे. जे लोक त्याच्यावर टीका करत आहेत, ते कदाचित मॅच पूर्णपणे पाहत नाहीत किंवा त्यांच्या मनात माझ्याविरुद्ध काहीतरी विशिष्ट अजेंडा आहे, असं खळबळजनक वक्तव्य अजिंक्य रहाणे याने यावेळी केलंय.

advertisement

लोक आपला हेवा किंवा मत्सर करत असावेत - रहाणे

मी माझ्याबाजूने चांगला खेळण्याचा प्रयत्न करतो पण मिळालेल्या यशाबद्दल लोक आपला हेवा किंवा मत्सर करत असावेत, असं मत देखील त्याने यावेळी व्यक्त केलं. मैदानाबाहेर काय चर्चा सुरू आहे याची आपल्याला अजिबात चिंता नाही, असं देखील त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं असून बॅटिंगमधील स्वतःच्या कामगिरीवर त्याने समाधान व्यक्त केलं आहे.

advertisement

MI vs KKR : 25 कोटींच्या कॅमरून ग्रीनला बॉलिंग का दिली नाही? कॅप्टन अजिंक्यने एका वाक्यात विषय संपवला! कुणावर फोडलं खापर?

वेगळ्या प्रकारच्या इनिंगची अपेक्षा असावी - अजिंक्य रहाणे

कधीकधी बॅटरला मैदानावर अपेक्षित लय किंवा फ्लो सापडत नाही, मात्र याचा अर्थ असा नाही की त्याचा खेळ संपला आहे. टीका करणाऱ्यांना क्रिकेटची समज नसावी किंवा त्यांना आपल्याकडून वेगळ्या प्रकारच्या इनिंगची अपेक्षा असावी, असं देखील अज्जू म्हणाला. अजिंक्य रहाणेच्या खेळात झालेल्या सकारात्मक बदलांची टीकाकारांनी अपेक्षा केली नव्हती, त्यामुळेच ही चर्चा होत आहे.

advertisement

वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

दरम्यान, लोक आपल्याबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही बोलले तरी आपल्याला त्याचा आनंदच आहे, कारण किमान ते आपल्याबद्दल बोलत तर आहेत, असं म्हणत अजिंक्य रहाणे याने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. केकेआरची मागील सिझनमधील कामगिरी चांगली नव्हती. पण आता केकेआर अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीमध्ये कमबॅक करेल, अशी अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : 'माझ्याविरुद्ध कट रचला जातोय...', KKR च्या दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचं खळबळजनक वक्तव्य! कुणाला केला आरोप?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल