काजोलचा हिरो, ज्याचं नाव ऐकूनच घाबरलेली माधुरी दीक्षित; करिश्मा कपूरसोबतही केलंय काम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actor Story : अभिनेत्याने सिनेसृष्टीतील आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॅक ग्राऊंड डान्सर म्हणून केली. त्यानंतर तो अभिनेता बनला आणि दिग्दर्शनातही त्याने पाऊल ठेवलं.
advertisement
1/9

3 एप्रिल 1973 रोजी कर्नाटकातील म्हैसूर इथं जन्मलेला हा अभिनेता. त्याला लहानपणापासून डान्सची आवड. त्यामुळे लहान वयातच त्याने शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. त्याचे वडील दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध डान्स टिचर होते. त्यामुळे घरीच सराव करून त्याने आपलं नृत्याचं कौशल्य इतकं विकसित केलं की पुढे ते त्याची ओळख बनलं.
advertisement
2/9
अभिनेत्याच्या कारकिर्दीची सुरुवात बॅक डान्सर म्हणून झाली. सुरुवातीला छोटी-मोठी कामं केल्यानंतर त्याला कोरियोग्राफर म्हणून संधी मिळाली. 1989 मध्ये त्याने कोरियोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अभिनयातही आपलं नशीब आजमावलं. नंतर दिग्दर्शन क्षेत्रातही त्याने पाऊल ठेवलं.
advertisement
3/9
त्याच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षण तेव्हा आला जेव्हा एका फिल्मच्या शूटिंगवेशळी त्याला अचानक पक्षाघाताचा झटका आला. डान्स करत असताना त्याच्या शरीराने अचानक काम करणं थांबवलं आणि तो जमिनीवर कोसळला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ पण त्याने हार मानली नाही आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन तो परतला.
advertisement
4/9
त्याला कोरिओग्राफीसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
advertisement
5/9
बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली तरी तो माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, काजोल, नगमा यांसारख्या अभिनेत्रींसोबत दिसला आहे.
advertisement
6/9
हा अभिनेता आहे प्रभू देवा ज्याचं पूर्ण नाव प्रभू देवा सुंदरम आहे. तो 'सपने' या चित्रपटात काजोलसोबत दिसला होता. त्याने 'चंदा रे चंदा रे कभी तो जमीन पर आ बैठेंगे बातें करेंगे' या गाण्यात काजोलसोबत रोमान्स केला होता, जे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं होतं.
advertisement
7/9
'कादलान' सारख्या चित्रपटांमुळे त्याला अभिनेता त्यांना ओळख मिळाली. करिश्मा कपूरच्या 'शक्ती: द पॉवर' या फिल्ममध्येही त्याने एक छोटी भूमिका साकारली होती. ते दोघं एका गाण्यात एकत्र दिसले. सलमान खानची वॉन्टेड फिल्म त्याने दिग्दर्शिक केली होती. जी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरली.
advertisement
8/9
'मैं ऐसा क्यूँ हूँ', 'मुकाबला' आणि 'के सेरा सेरा' यासारख्या गाण्यांमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली. 'पुकार' फिल्ममध्ये त्याने माधुरी दीक्षितसोबत 'के सारा, सारा सारा' या गाण्यावर डान्स केलं होतं.
advertisement
9/9
माधुरीने एका मुलाखतीत सांगितलं की, या गाण्याच्या शूटिंगवेळी जेव्हा तिला समजलं की ती प्रभूदेवासोबत डान्स करणार आहे तेव्हा ती खूप घाबरली होती. नंतर प्रभूदेवाने तिला ती एक खूप चांगली डान्सर असल्याचं समजावून सांगितलं आणि नंतर त्यांनी एकत्र हे गाणं पूर्ण केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काजोलचा हिरो, ज्याचं नाव ऐकूनच घाबरलेली माधुरी दीक्षित; करिश्मा कपूरसोबतही केलंय काम