मराठवाड्यात थंडीचा कडाका, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा घसरला, पाहा आज काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
गेल्या काही दिवसात राज्यातील गारठा चांगलाच वाढलाय. मराठवाड्यातमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला असून काही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसात राज्यातील गारठा चांगलाच वाढलाय. सरासरी किमान तापमान कमालीची घट झाली असून हाड गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीने नागरिक कुडकुडले आहेत. मराठवाड्यातमध्ये थंडीचा चांगलाच कडाका वाढला असून काही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
advertisement
2/5
परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा घसरलेला पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये आज किमान तापमान 9 अंश सेल्सिअस एवढे असेल. थंडीचा कडाका वाढल्याने मराठवाड्यात शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.
advertisement
3/5
जालना, बीड, नांदेड आणि धाराशिवमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस असेल. हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. याठिकाणी आज हवामान कोरडे असेल.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. शहरात सकाळचा वेळी धुके पडत आहे.
advertisement
5/5
दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. गरम कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होताना दिसतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मराठवाड्यात थंडीचा कडाका, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा घसरला, पाहा आज काय स्थिती?