TRENDING:

Pune Crime: पुण्यात सोबत राहायचे दोघं, पण अचानक मित्रानं डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या, कारण जाणून हादरून जाल

Last Updated:

'जेवण कोणी बनवायचं?' या साध्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट खुनात झालं. यात एका तरुणाच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी : पुण्यातील मोशी परिसरात एका क्षुल्लक वादातून हत्येची थरारक घटना घडली आहे. 'जेवण कोणी बनवायचं?' या साध्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट खुनात झालं. यात एका तरुणाच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोशीतील हवालदार वस्ती येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या (प्रतिकात्मक फोटो )
डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या (प्रतिकात्मक फोटो )
advertisement

नेमकी घटना काय?

बालाजी मारुती खंडारे (वय ३२, मूळ रा. उदगीर, जि. ला लातूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याचाच मित्र प्रदीप विठ्ठल गुंडरे (वय २९, मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर) याला बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही तरुण कामासाठी लातूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते आणि मोशी परिसरात एकत्र राहत होते.

advertisement

क्षुल्लक कारणाने घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये जेवण बनविण्यावरून जोरदार भांडण झालं. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापलेल्या प्रदीपनं घरातील गॅस सिलिंडरची टाकी उचलून थेट बालाजीच्या डोक्यात मारली. या भीषण हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. एका छोट्याशा वादाने एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

उबेर ड्रायव्हरची हत्या 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दुसऱ्या एका घटनेत ऐरोली येथील ३३ वर्षीय उबेर ड्रायव्हर नासिर सलाम अहमद यांची माळशेज घाटातील गणेशखिंड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने टिटवाळा येथील २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपीने हा खून स्वसंरक्षणासाठी केल्याचा दावा केला असला तरी, रक्ताने माखलेली गाडी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यात सोबत राहायचे दोघं, पण अचानक मित्रानं डोक्यात सिलिंडर घालून केली हत्या, कारण जाणून हादरून जाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल