TRENDING:

Chutney Recipe : भाजीला काय करावं कळत नाहीये? झटपट बनवा चटपटीत कैरी-कांद्याची चटणी! पाहा रेसिपी

Last Updated:

How to make raw mango chutney : आपल्याला काय करावं हे सुचत नाही, काहीवेळा घरात भाजीला काही नसतं, तर काहीवेळा त्याच त्या भाज्या खाऊन आपण बोअर होतो. अशा परिस्थितीसाठी आम्ही एक सोल्युशन घेऊन आलो आहोत, एक भन्नाट रेसिपी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रत्येक हा रोजचा प्रश्न असतो, आज भाजीला काय बनवावं? याच उत्तर लोक आपापल्या परीने शोधत राहतात. बऱ्याच आपल्याला काय करावं हे सुचत नाही, काहीवेळा घरात भाजीला काही नसतं, तर काहीवेळा त्याच त्या भाज्या खाऊन आपण बोअर होतो. अशा परिस्थितीसाठी आम्ही एक सोल्युशन घेऊन आलो आहोत, एक भन्नाट रेसिपी.
चटपटीत कैरी-कांद्याची चटणी बनवण्याची सोपी पद्धत..
चटपटीत कैरी-कांद्याची चटणी बनवण्याची सोपी पद्धत..
advertisement

ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे, तितकीच ती टेस्टीदेखील आहे. चटपटीत कैरी-कांद्याची चटणी, नाव ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल. ही रेसिपी myflavourfuljourney या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चाल तर मग पाहूया टेस्टी आणि झटपट बनणारी चटपटीत कैरी-कांद्याची चटणी कशी बनवायची.

चटपटीत कैरी-कांद्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

advertisement

- कैरी

- कांदा

- हळद

- तिखट

- मीठ

- डाळावं

- लसूण

- हिरव्या मिरच्या

- कोथिंबीर

- तेल

- मोहरी

- जिरं

- तीळ

- हिंग

चटपटीत कैरी-कांद्याची चटणी बनवण्याची सोपी पद्धत..

- सर्वात आधी कैरी घ्या. तिची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.

- त्यानंतर कांदा घ्या आणि तोही बारीक चिरून घ्या.

advertisement

- आता खलबत्ता घ्या त्यामध्ये कैरीच्या फोडी टाका.

- या कैरीवर हळद, तिखट, मीठ टाकून ते सर्व व्यवस्थित कुटून घ्या.

- यानंतर यामध्ये डाळावं आणि लसणाच्या काही पाकळ्या टाकून थोडं कुटा.

- आत यामध्ये चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून पुन्हा व्यवस्थित कुटून घ्या.

- आता एक तडका तयार करा. यासाठी तेल गरम करा.

advertisement

- गरम तेलामध्ये मोहरी, जिरं, तीळ आणि हिंग टाका.

- हा गरम तडका सुटलेल्या कैरीच्या चटणीमध्ये टाका.

तर अशाप्रकारे तुमची झटपट बनणारी चटपटीत कैरी-कांद्याची चटणी तयार आहे. तुम्ही चटणी चपातीसोबत किंवा वरण-भातासोबत खाऊ शकता. यामध्ये तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Chutney Recipe : भाजीला काय करावं कळत नाहीये? झटपट बनवा चटपटीत कैरी-कांद्याची चटणी! पाहा रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल