Team India : टीम इंडियाचे दोन वर्ल्ड चॅम्पियन वर्षावर, मुख्यमंत्री फडणवीसांनी केला स्पेशल सन्मान!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
1/6

वर्ल्ड कप विजेत्या आणि मुंबईकर असलेल्या दोन खेळाडूंचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी या दोन्ही खेळाडूंचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
advertisement
2/6
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.
advertisement
3/6
रविवारी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे मंगळवारी मुंबईमध्ये दाखल झाले, त्यानंतर या दोघांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस यांनी दोघांचाही सत्कार केला.
advertisement
4/6
याआधी 2024 साली टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकली होती तेव्हाही सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे भारतीय टीमचा भाग होते. या दोघांसोबतच कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही खेळाडूही मुंबईचे होते. 2024 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित, सूर्या, दुबे आणि जयस्वाल यांचा विधिमंडळामध्ये सत्कार करण्यात आला होता.
advertisement
5/6
कर्णधार सूर्यकुमार यादव याचं नाव टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय कर्णधारांमध्ये जाऊन पोहोचलं आहे. याआधी धोनी आणि रोहित शर्मा यांच्याच नेतृत्वात भारताला वर्ल्ड कप जिंकता आला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सूर्याने 9 इनिंगमध्ये 30.25 ची सरासरी आणि 136.72 च्या स्ट्राईक रेटने 242 रन केले. नाबाद 84 रन हा सूर्याचा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर होता.
advertisement
6/6
दुसरीकडे शिवम दुबेनेही टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयात मोलाची भूमिका बजावली. दुबेने वर्ल्ड कपच्या 8 इनिंगमध्ये 39.17 च्या सरासरी आणि 169.06 च्या स्ट्राईक रेटने 235 रन केल्या, याशिवाय त्याने 5 विकेटही घेतल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडियाचे दोन वर्ल्ड चॅम्पियन वर्षावर, मुख्यमंत्री फडणवीसांनी केला स्पेशल सन्मान!