TRENDING:

T20 World Cup : टीम इंडियाचा 'अनसंग हिरो', पोटासाठी चालवायचा स्कूल बस, आता जिंकवले 2 वर्ल्ड कप!

Last Updated:

टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी लागोपाठ दुसरा वर्ल्ड कप जिंकवून इतिहास घडवला. या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंची देशभरात कौतुक होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी लागोपाठ दुसरा वर्ल्ड कप जिंकवून इतिहास घडवला. या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंची देशभरात कौतुक होत आहे, पण फक्त टीम इंडियाचे खेळाडूच नाही तर पडद्यामागील व्यक्तींचाही हात आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एक असा व्यक्ती आहे, ज्याने सलग दुसऱ्यांदा भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यास मदत केली आहे. टीम इंडियामध्ये याची ओळख बव्वा म्हणून आहे.
टीम इंडियाचा 'अनसंग हिरो', पोटासाठी चालवायचा स्कूल बस, आता जिंकवले 2 वर्ल्ड कप!
टीम इंडियाचा 'अनसंग हिरो', पोटासाठी चालवायचा स्कूल बस, आता जिंकवले 2 वर्ल्ड कप!
advertisement

नुवान सेनेविरत्ने हा श्रीलंकेचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे. सध्या तो टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये लेफ्ट आर्म थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून काम करतो.

टीम इंडियाने रविवारी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सेनेविरत्ने याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये नुवान सेनेविरत्नेच्या हातामध्ये टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे. '2023 ला या जागेने मला फारशा चांगल्या नाहीत, अशा आठवणी दिल्या. 2026 ला या जागेने माझ्यासाठी नवीन आठवणी निर्माण केल्या. 2024 आणि 2026 सलग दोन टी-20 वर्ल्ड कप, टीम इंडिया. कायमच', अशी कॅप्शन नुवान सेनेविरत्ने यांनी या फोटोला दिली आहे.

advertisement

सेनेविरत्ने टीम इंडियाच्या विजयाचा हिरो

नुवान सेनेविरत्ने हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो आहे. तो टीम इंडियाच्या बॅटरना डावखुऱ्या फास्ट बॉलर्सविरुद्ध तयार करतो. नुवान बॅटरना वेगवेगळ्या कोनातून सराव करायला लावतो. त्याच्या सततच्या कठोर परिश्रमामुळे भारतीय बॅटिंग लाइनअप मजबूत झाली. टीम इंडियाच्या विजयानंतर, श्रीलंकेच्या माध्यमांमध्ये त्याचे कौतुक झाले. श्रीलंकेचा एक माणूस भारताच्या यशात कसा हातभार लावत आहे, यावर माध्यमांनी प्रकाश टाकला.

advertisement

स्कूल बस चालवायचा सेनेविरत्ने

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

नुवान सेनेविरत्नेचा जन्म 14 नोव्हेंबर 1979 रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. 2004 मध्ये, नुवानने दोन प्रथम श्रेणी सामने खेळले, पण त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नुवानला कोलंबोमध्ये स्कूल बस ड्रायव्हर म्हणून काम करावे लागले. त्याने एनसीसी ग्राउंडवर बॅटरना प्रशिक्षणही दिले. 2017 मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान, नुवानला विराट कोहलीने पाहिले आणि त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये भूमिका मिळाली. 2018 च्या आशिया कपसाठी नुवान भारतीय टीममध्ये सामील झाला आणि तेव्हापासून तो भारतीय सपोर्ट स्टाफचा भाग आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाचा 'अनसंग हिरो', पोटासाठी चालवायचा स्कूल बस, आता जिंकवले 2 वर्ल्ड कप!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल