Tata Sierra ची हेवी 'टेस्ट ड्राईव्ह'! महिलेनं शोरूमधून SUV बाहेर काढली अन् रिक्षाला उडवून खड्यात पाडली, सगळे चालत बाहेर आले, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
ठाण्यामध्ये नव्या कोऱ्या Tata Sierra सोबत एक धक्कादायक प्रकार घडला. Tata Sierra ची टेस्ट ड्राईव्ह करणाऱ्या महिलेचं अचानक नियंत्रण सुटलं आणि नवी कोरी सियारा ३५ फुट खोल खड्यात पडली. सुदैवाने या महिलेला काहीच झालं नाही. (प्रेम मोरे, प्रतिनिधी)
advertisement
1/10

टाटा मोटर्सने अलीकडे मोठा गाजावाजा करत आपली लिजेंड समजली जाणारी Tata Sierra ही एसयूव्ही लाँच केली. Tata Sierra ची डिलिव्हरी सुरू झाली असून रस्त्यावर धावताना दिसत आहे. आकर्षक लूक आणि स्टायलिश अशी Tata Sierra घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. अशातच ठाण्यामध्ये नव्या कोऱ्या Tata Sierra सोबत एक धक्कादायक प्रकार घडला. Tata Sierra ची टेस्ट ड्राईव्ह करणाऱ्या महिलेचं अचानक नियंत्रण सुटलं आणि नवी कोरी सियारा ३५ फुट खोल खड्यात पडली. सुदैवाने या महिलेला काहीच झालं नाही.
advertisement
2/10
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील पाचपाखडी परिसरात ही घटना घडली आहे. Tata Sierra आता शोरूमध्ये उपलब्ध झाली आहे. Tata Sierra ची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी एक महिला शोरूमला पोहोचली. पिवळ्या रंगाची दमदार सियारा बाहेर काढण्यात आली.
advertisement
3/10
महिलेनं Tata Sierra सुरू केली आणि शोरूममधून बाहेर पडली, काही अंतर पार केल्यानंतर गाडी ही पाचपाखडी परिसरातील उत्सव हॉटेलच्या मागे पोहोचली. यावेळी कारमध्ये शोरूमचा कर्मचारीही होता.
advertisement
4/10
पाचपाखाडी परिसरात एका इमारतीचं पायाभरणीसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. अचानक या महिलेचं नव्या कोऱ्या Tata Sierra वरच नियंत्रण सुटलं, त्यानंतर गाडीने रस्त्यावरील चहाची टपरी, रिक्षा आणि दुचाकी वाहन धडक देऊन थेट बांधकाम सुरू असलेल्या शेडमध्ये घुसली.
advertisement
5/10
शेडमध्ये घुसल्यानंतर थेट ३० ते ३५ फुट खोल खड्ड्यात कोसळली. गाडी थेट बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या अपघातावेळी गाडीत एक महिला तिचा नातेवाईक आणि एक कंपनीचा कर्मचारी होता.
advertisement
6/10
स्थानिकांनी धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रिक्षा, दुचाकीचं मात्र नुकसान झाालं आहे. रिक्षाच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
7/10
Tata Sierra चंही खड्यात कोसळून जास्त नुकसान झालं. गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला. छत आणि बाजूने Tata Sierra चं मोठं नुकसान झालं. पण, Tata Sierra मधील महिला, तिचा नातेवाईक आणि शोरूमच्या कर्मचाऱ्याला कोणतीही इजा झाली नाही.
advertisement
8/10
Tata Sierra खड्यात कोसळूनही सगळे जण सुखरूप होते, सगळे जण चालत खड्यातून बाहेर आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
9/10
जखमी झालेल्या तिघांना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी कौसल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
10/10
सध्या नौपाडा पोलिस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून गाडी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra ची हेवी 'टेस्ट ड्राईव्ह'! महिलेनं शोरूमधून SUV बाहेर काढली अन् रिक्षाला उडवून खड्यात पाडली, सगळे चालत बाहेर आले, PHOTOS