TRENDING:

फक्त 1500 रुपयांच्या EMI वर मिळेल ही बाइक! फूल टँकमध्ये चालते 700KM

Last Updated:
TVS Sport on EMI: तुम्हालाही कमी ईएमआयमध्ये एखादी बाइक खरेदी करायची असेल तर आज आपण एक बेस्ट ऑप्शन पाहणार आहोत. टीव्हीएस स्पोर्ट तुम्ही फूल पेमेंट न देता ईएमआयवर खरेदी करु शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7
फक्त 1500 रुपयांच्या EMI वर मिळेल ही बाइक! फूल टँकमध्ये चालते 700KM
अनेकांना नवी बाइक घ्यायची इच्छा असते. पण त्यांचं बजेट तेवढं नसतं. त्यांना अशी बाइक हवी असते ती कमी किंमतीत मिळावी, मायलेजही चांगलं असावं. तर आज आपण अशाच एका बाइकविषयी जाणून घेणार आहोत. ती बाइक म्हणजे TVS Sport आहे. जी विशेषतः रोज ऑफिस किंवा शहरात ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
advertisement
2/7
एखाद्या व्यक्तीला कमी किंमतीत चांगल्या मायलेजची बाइक खरेदी करायीच असेल. तर हा चांगला ऑप्शन ठरु शकतो. भारतीय बाजारात कमी किंमत आणि चांगल्या मायलेजमुळे या बाइकची खुप डिमांड राहते.
advertisement
3/7
दिल्लीमध्ये या बाइकचे Self Start ES मॉडलची ऑन-रोड किंमत 64,431 रुपयांपासून सुरु होते. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये सेल्फ-स्टार्ट आणि अलॉय व्हील्ससारखे फीचर्स मिळतात. किंमत शहर आणि व्हेरिएंटनुसार बाईकच्या किमंतीत थोडा फार बदल पाहायला मिळू शकतो.
advertisement
4/7
तुम्हाला किती कर्ज मिळेल? : एखाद्याला ही बाईक पूर्ण पेमेंट देण्याऐवजी EMI वर खरेदी करायची असेल, तर बाईकचा फायनान्स प्लॅन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ही बाईक 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटने खरेदी केली तर तुम्हाला अंदाजे 54,431 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
advertisement
5/7
अंदाजे 9.7% व्याजदराने, या कर्जामुळे तीन वर्षांसाठी अंदाजे 1,749 रुपयेचा मासिक EMI मिळेल. खरंतर, प्रत्यक्ष व्याजदर आणि EMI व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअरवर आणि वित्त कंपनीवर अवलंबून असेल. शिवाय, जर तुम्ही हे कर्ज 42 महिन्यांच्या मुदतीसाठी घेतले तर तुम्हाला 1,534 रुपयांचा EMI भरावा लागेल.
advertisement
6/7
TVS Sport बाइक किती मायलेज देते : मायलेजच्या बाबतीत ही बाईक परवडणारी मानली जाते. कंपनीनुसार ही बाइक 70 किलोमीटर प्रति लिटरपेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. जे रोजच्या वापरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये 109.7 सीसीचं इंजिन मिळतं आणि याची टॉप स्पीड जवळपास 90 किमी प्रति तास असू शकते.
advertisement
7/7
सस्पेंशनविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉर्क एब्जॉर्बर दिले आहेत. ज्यामुले रस्त्यांवर चालताना खुप संतुलन आणि आराम मिळतो. बाजारात याची टक्कर Hero HF 100, Honda CD 110 Dream आणि Bajaj CT 110X सारख्या बाईकशी होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फक्त 1500 रुपयांच्या EMI वर मिळेल ही बाइक! फूल टँकमध्ये चालते 700KM
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल