Dhurandhar Star Cast Fees: जबरदस्त अभिनय असूनही अक्षय खन्नाला रणवीर सिंगपेक्षा कमी मानधन, बाकी कलाकारांच्या फीचं काय?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आदित्य धर दिग्दर्शित, स्पाय, ॲक्शन आणि थ्रिलर 'धुरंदर' चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे. 'धुरंदर' चित्रपटासाठी रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्तसह इतरत्र कलाकारांनी किती मानधन घेतलंय, जाणून घेऊया...
advertisement
1/8

आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर' चित्रपटाची फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये फार मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. 'धुरंदर'च्या घवघवीत यशानंतर चाहते, 'धुरंदर: द रिव्हेंज'साठी चाहते आतुर आहेत. 'धुरंदर'ने भारतात 838.50 कोटींची कमाई केलेली असून चित्रपटाने जगभरात 1305 कोटींची कमाई केलेली आहे.
advertisement
2/8
स्पाय ॲक्शन थ्रिलर 'धुरंदर 2' चित्रपट येत्या 19 मार्चला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'धुरंदर' चित्रपटाचे एकूण 250 ते 280 कोटी इतका बजेट आहे. पण चित्रपटाने त्यापेक्षा चार ते पाच पट अधिकची कमाई केलेली आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी रणवीरसह अक्षय आणि इतरत्र स्टारकास्टने किती फी आकारली आहे, जाणून घेऊया...
advertisement
3/8
'धुरंदर' चित्रपटामध्ये रणवीर सिंगने हमजा अली मजारी ही प्रमुख भूमिका साकारली आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंगने स्पाय ॲक्शन थ्रिलर या चित्रपटासाठी 50 कोटींची फी आकारली आहे. चित्रपटाचे सध्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता अभिनेत्याने एकदम बरोबर मानधन आकारले आहे.
advertisement
4/8
रहमान डकैत या व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाने तब्बल 2.5 कोटींचं मानधन साकारलं आहे. व्हिलनची भूमिका साकारत असला तरीही अभिनेत्याने सर्वच कलाकारांचे मार्केट खाल्लं आहे. अभिनेत्याच्या दमदार अभिनयाचं सर्वच स्तरावर कौतुक होतंय.
advertisement
5/8
एस.पी. चौधरी असलमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय दत्तने 10 कोटींचं मानधन साकारलं आहे.
advertisement
6/8
इंटेलिजन्स ब्यूरो चिफचे प्रमुख अजय सान्याल यांची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनने 9 कोटी इतकं मानधन साकारलं आहे.
advertisement
7/8
चित्रपटात अर्जुन रामपालने क्रूर आयएसआय अधिकारी मेजर इक्बालची भूमिका साकारली असून त्याला 1 कोटी रूपये मानधन साकारलं आहे.
advertisement
8/8
तर, सारा अर्जुनने सुद्धा चित्रपटामध्ये 1 कोटी इतके मानधन साकारलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar Star Cast Fees: जबरदस्त अभिनय असूनही अक्षय खन्नाला रणवीर सिंगपेक्षा कमी मानधन, बाकी कलाकारांच्या फीचं काय?