मिळालेल्याा माहितीनुसार, उमरगा शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर - हैदराबाद महामार्गावर मंगळवारी दुपारी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघात माजी नगरसेवक बळी पवार आणि जनता अर्थ मुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा मृत्यू झााला आहे.
तेलंगणा राज्यातील परिवार तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन परत आपल्या गावी जात होतं. उमरगा चौरस्ता जवळील भारत टायरजवळ अचानक कार क्रमांक टि.एस. 34 एफ 4706 या भरधाव कारचे टायर फुटले.
advertisement
टायर फुटल्यामुळे वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटून महामार्गाच्या बाजूस असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये शिरला. यावेळी चहाच्या स्टॉलमध्ये चहा घेत बसलेले ग्राहकांना जोराची धडक दिली. कारचा वेग इतका होती की, धडक दिल्यामुळे चहाच्या स्टॉलसमोर उभी असलेली एका दुचाकीचा पार चक्काचूर झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. या अपघातामध्ये उमरगा येथील माजी नगरसेवक बळी पवार आणि जनता अर्थ मुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद या दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. तर मेकॅनिक सचिन कुठार हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
