TRENDING:

2 कोटींच्या कारचा चक्काचूर, प्रसिद्ध उद्योगपतीचा भीषण अपघातात मृत्यू, थरकाप उडवणारे PHOTO

Last Updated:
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर BMW कारचा भीषण अपघात झाला. प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा मृत्यू झाला. गाडीचा चक्काचूर झाला आणि माहेश्वरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
advertisement
1/7
2 कोटींच्या कारचा चक्काचूर, प्रसिद्ध उद्योगपतीचा भीषण अपघातात मृत्यू
देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान मानल्या जाणाऱ्या 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे'वर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. ही गाडी 2 कोटी रुपयांची असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
2/7
BMW कारचा वेग इतका भीषण होता की, नियंत्रण सुटल्यानंतर ती थेट पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गाडीचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, वल्लभ माहेश्वरी हे जयपूरहून बडोदामेवकडे जात होते. अलवरमधील रेणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा वेग अफाट होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली.
advertisement
4/7
धडक इतकी जोरात बसली की, त्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक हादरून गेले. धावत जाऊन पाहिलं तर आलिशान BMW एखाद्या कागदासारखी दुमडली गेली होती. गाडीची अवस्था पाहून कोणालाही आत जिवंत असेल असं वाटत नव्हतं.
advertisement
5/7
वल्लभ माहेश्वरी आणि त्यांचा चालक गाडीच्या सांगाड्यात वाईट पद्धतीने अडकले होते. पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली, पण गाडीचा पुढचा हिस्सा पूर्णपणे चक्काचूर झाल्याने त्यांना बाहेर काढणं अशक्य झालं होतं.
advertisement
6/7
तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र, तोपर्यंत व्हायचा तो घात झाला होता. गंभीर जखमी झालेल्या माहेश्वरी यांना तातडीने अलवरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
advertisement
7/7
मात्र, त्यांच्या शरीराला झालेल्या जखमा इतक्या खोल होत्या की डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच माहेश्वरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
2 कोटींच्या कारचा चक्काचूर, प्रसिद्ध उद्योगपतीचा भीषण अपघातात मृत्यू, थरकाप उडवणारे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल