TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर आग ओकणारं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढली असून पारा चाळीशी पार गेला आहे. सोमवारी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: महाराष्ट्रावर आग ओकणारं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
यंदा महाराष्ट्रात मार्च महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलंय. आता दुसऱ्या आठवड्यात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यात ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. 9 मार्च रोजी राज्यातील कोकण ते विदर्भ हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. सोमवारी देखील मुंबईसह, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात कमाल तापमान 32-35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात सरासरी कमाल तापमान 34-38 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे. तर किमान तापमान 20-23 अंश सेल्सिअसपर्यत राहील. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवानाचा अंदाज आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात कमाल तापमान चाळीशीच्या घरात गेलंय. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 72 तास मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत धोका वाढणार असून नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात देखील सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवस हवामानाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
राज्यात विदर्भात सर्वाधिक उष्ण वातावरण जाणवत आहे. कमाल तापमान 41 अंशांवर गेलं असून काही जिल्ह्यांना ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. अकोला आणि अमरावतीत सर्वाधिक तापमान नोंदवण्यात येत असून पुढील काही दिवस उष्णतेची लाट असणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यातील मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आग ओकणारं संकट येणार आहे. तापमान सरासरीपेक्षा 3-6 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. विदर्भ, मराठवाड्यासह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर आग ओकणारं संकट, 11 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल