T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, उपविजेती न्यूझीलंडही मालामाल, किती प्राईज मनी मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान हा सामना जिंकून भारताने वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं.त्यामुळे या विजयानंतर भारताला किती बक्षीस रक्कम मिळणार आणि उपविजेत्या ठरलेल्या न्यूजीलंडला किती रक्कम मिळणार?हे जाणून घेऊयात.
advertisement
1/10

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले आहे.
advertisement
2/10
टीम इंडियाने दिलेल्या 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला फक्त 159 धावांवर ऑल आऊट केल होते. अशाप्रकारे भारताने हा फायनलचा सामना 96 धावांनी जिंकला होता.
advertisement
3/10
भारताने हा सामना जिंकून तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तसेच याआधी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नव्हते.पण भारताने आज ही किमया करून दाखवली आहे. यजमान टीमला आतापर्यंत वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. पण भारताने ही गोष्ट अहमदाबादच्या मैदानावर करून दाखवली आहे.
advertisement
4/10
दरम्यान हा सामना जिंकून भारताने वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं.त्यामुळे या विजयानंतर भारताला किती बक्षीस रक्कम मिळणार आणि उपविजेत्या ठरलेल्या न्यूजीलंडला किती रक्कम मिळणार?हे जाणून घेऊयात.
advertisement
5/10
टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघांनी सहभाग नोंदवला होता.त्यापैकी 18 संघ आता बाहेर झाले आहेत.फक्त आता भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघच उरले आहेत.या संघांवर पैशांचा वर्षाव होणार आहे.
advertisement
6/10
आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप 2026 साठी जवळ जवळ 120.37 करोडची बक्षीस राशी जाहीर केली होती.मागच्या वर्षी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर त्यांना बक्षीस स्वरूपात 20.4 कोटी मिळाले होते.
advertisement
7/10
यंदाच्या वर्षी बक्षीस रक्कम वाढवण्यात आली असून विजेत्या संघाला 27 करोड हून अधिकची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकलेल्या भारताला 27 करोड हून अधिक रक्कम मिळणार आहे.
advertisement
8/10
या वर्ल्डकपमध्ये उपविजेता आणि रनरअप ठरणाऱ्या न्यूझीलंड संघाला 14.65 करोडची रक्कम मिळणार आहे.
advertisement
9/10
या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक मॅच जिंकणाऱ्या संघाला 31154 डॉलर म्हणजेच 28.50 लाख रूपये देण्यात आले आहेत. तर सेमी फायनल गाठणाऱ्या साऊथ आफ्रिकेला 7.24 करोड मिळणार आहेत. यामध्ये बोनस रक्कम जोडून 9.23 करोड रूपये मिळणार आहे. याच फॉर्म्युल्यानंतर दुसरा सेमी फायनल हारणाऱ्या इंग्लंडला तितकीच रक्कम मिळणार आहे.
advertisement
10/10
तसेच पाचव्या आणि बाराव्या स्थानापर्यंत असणाऱ्या टीमला 3.48 करोड रूपये मिळणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, उपविजेती न्यूझीलंडही मालामाल, किती प्राईज मनी मिळणार?