TRENDING:

Success Story : नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, वर्षाला 3 कोटी उलाढाल

Last Updated:

प्रमोद सुसरे या तरुणाने भंगारातील वस्तूंचा पुनर्वापर करून करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रमोद यांनी काही काळ नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

advertisement
पुणे : अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे असलेले प्रमोद सुसरे या तरुणाने भंगारातील वस्तूंचा पुनर्वापर करून करोडोंचा व्यवसाय उभा केला आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रमोद यांनी काही काळ नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच P2S International Furniture World हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामध्ये भंगारात टाकून दिलेल्या वस्तूंना नव्या डिझाईनमध्ये रूपांतरित करून ते आकर्षक आणि टिकाऊ फर्निचर तयार करतात. त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असून आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

प्रमोद सुसरे यांनी सांगितले की, ते नोकरीनिमित्त पुण्यात आले होते. काही काळ त्यांनी नोकरी केली, मात्र नोकरीत मन रमत नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली हा व्यवसाय स्थापन केला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

UPSC Success Story : घरी बेताची परिस्थिती, पण त्याने ठरवलं 'अधिकारी व्हायचं'; शेवटी सालगड्याच्या पोरानं करून दाखवलं

advertisement

भंगार गोळा करतो म्हणून काही जण हसायचेही, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. भंगारातून विविध उत्पादने तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. या जुन्या वस्तूंपासून चेअर, ड्रम सोफा, टायर सोफा, स्कूटर डायनिंग टेबल अशा अनेक प्रकारच्या वस्तू बनवतात. आजपर्यंत त्यांनी 3 हजारांहून अधिक उत्पादने तयार केली आहेत. त्यांच्या उत्पादनांची विक्री देशभरात होत असून काही उत्पादने परदेशातही निर्यात केली जातात.

advertisement

ही कल्पना सुचली कशी?

ही कल्पना त्यांना चीनमध्ये असताना सुचली. रांजणगावमध्ये एका कंपनीत काम करत असताना त्यांना कंपनीमार्फत चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली. चीनमध्ये असताना त्यांनी एका दुकानात जुन्या टायरपासून फर्निचर बनवले जात होते. भारतात परतल्यावर त्यांनी अशाच प्रकारच्या व्यवसायात काम केले आणि अनुभव घेतला. नंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. गेल्या वर्षी त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 3 कोटी रुपये होती. येत्या दोन वर्षांत ती 5 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, वर्षाला 3 कोटी उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल