Tips And Tricks : फ्लाइट बुक करताना 'या' ट्रिक्स फॉलो करा; कमी किमतीत मिळेल तिकीट, वाचतील भरपूर पैसे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to get flight ticket in cheap rate : उन्हाळयाच्या सुट्ट्यात बरेच लोक फिरायला जातात. डेस्टिनेशन भारतातलं असो की, भारताबाहेरचं बरेच लोक विमानाने प्रवास करणं निवडतात. मात्र बऱ्याचदा आपण कोणतेही हॅक्स न वापरता सरळ तिकीट बुक करतो तेव्हा आपल्याला तिकिटाचे पैसे पूर्ण भरावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला यासाठी काही टिप्स देत आहोत.
advertisement
1/7

तुम्हालाही फिरायचा प्लॅन असेल किंवा कोणत्याही कारणास्तव कुठे जायचं असेल तर विमानाचं तिकीट बुक करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमचे तिकीट कमी किमतीत बुक होईल आणि तुमचे भरपूर पैसे वाचतील.
advertisement
2/7
ही ट्रिक खूप भन्नाट आहे. फ्लाईट बुकिंग करताना इनकॉग्निटो मोड वापरा. कारण जेव्हा वारंवार फ्लाइट किंवा हॉटेल शोधले जातात, तेव्हा ब्राउझर कुकीज तुमची सर्च हीस्ट्री ट्रॅक करतात. यामुळं तिकिटांचे दर वाढतात. म्हणून बुकिंग इनकॉग्निटो मोडमध्ये किंवा खाजगी ब्राउझिंगमध्ये करा. यामुळे एअरलाइन्सना तुमचे सर्चेस दिसत नाही आणि तुम्हाला तिकीट कमी किमतीत मिळतं.
advertisement
3/7
ही ट्रिक तशी सर्वांसाठीच सोयीची आहे असं नाही. पण ज्या लोकांना फिरायला आवडतं आणि ते कधीही फिरू शकतात. त्यांना ही कमी येऊ शकते. कोणत्याही पर्यटन स्थळाचा पीक सीजन असतात तिथे जाऊ नका. ऑफ सीजन किंवा पीक सिजनमध्ये प्रवास करा. कारण तेव्हा गर्दी कमी असते. अशावेळी तुम्हाला हॉटेल्स आणि फ्लाइट तिकीटाची स्वस्तात मिळतात. यावेळी तुमचे पैसेही वाचतील आणि जास्त गर्दी राहणार नाही.
advertisement
4/7
यासोबतच जेव्हा तुम्ही तिकीट बुक करता तेव्हा काही डील्स किंवा डिस्काऊंट आहेत का हे शोधा. त्याबरोबर तुमच्याकल्डे असलेल्या कोणत्याही डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर काही डिस्काऊंट मिळतंय का हेदेखील पाहा.
advertisement
5/7
ट्रीपमध्ये तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर फिरायला गेल्यानंतर त्याठिकाणी प्रायव्हेट टॅक्सीपेक्षा मेट्रो, स्थानिक बस, वाहन भाड्याने घेऊन फिरा. यामुळं तुमचे पैसे वाचतील. तसंच तुम्हाला शहरातील रस्ते आणि संस्कृती जवळून अनुभवता येईल.
advertisement
6/7
तसेच ट्रिपच्या ठिकाणी स्ट्रीट फूड आणि स्थानिक भोजनालयांमध्ये जेवा. यामुळे तुम्हाला तिथलं अस्सल आणि पारंपारिक चवीचं जेवण कमी किमतीत मिळेल. तसेच तुमच्योसबत सुकामेवा, बिस्किटे किंवा फळे ठेवा. यामुळे तुम्हाला वेळोवेळो महागडे स्नॅक्स खरेदी करावे लागणार नाहीत.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : फ्लाइट बुक करताना 'या' ट्रिक्स फॉलो करा; कमी किमतीत मिळेल तिकीट, वाचतील भरपूर पैसे