TRENDING:

Ishan Kishan Gf : लाल ड्रेसवर नातवाची गर्लफ्रेंड व्हायरल झाली, इशानच्या आजोबांनी थेट लग्नाला दिला हिरवा कंदील! काय म्हणाले?

Last Updated:

Ishan Kishan Grand Father on Aditi Hundia : टीम इंडियाच्या विजयानंतर ईशान किशन आणि मॉडेल अदिती हुंडिया यांच्या नात्याबद्दलही आजोबांनी मोकळेपणानं भाष्य केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ishan Kishan Gf Aditi Hundia : भारतीय टीमने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विकेटकीपर फलंदाज ईशान किशनच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. ईशान किशनच्या चुलत बहिणीचा फायनल मॅचच्या आदल्या दिवशी अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटूंबात दु:खाचं वातावरण होतं. अशातच ईशान किशनने आपल्या बहिणीसाठी अर्धशतक ठोकलं अन् आभाळाकडं पाहून तिला खेळी समप्रीत केली. तर दुसरीकडे ईशान किशनची गर्लफ्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Ishan Kishan Grand Father on Girl Friend Aditi Hundia gives green signal
Ishan Kishan Grand Father on Girl Friend Aditi Hundia gives green signal
advertisement

अदितीला पाहून आनंद झाला

ईशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी आपल्या नातवाच्या आणि संपूर्ण टीमच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केला. "ईशानने जशी कामगिरी केली ते पाहून खूप आनंद होत आहे. तसेच त्याच्या मैत्रिणीला मैदानात पाहून आनंद झाला. आमच्या नातवानंही कमाल केली," असं म्हणत त्यांनी ईशानच्या योगदानाचं कौतुक केलं. या मॅचमध्ये ईशानने उपयुक्त 54 रन्सची खेळी केली आणि 3 कठीण कॅचही घेतले त्यामुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला.

advertisement

दोघांच्या नात्याला हिरवा कंदील

या विजयानंतर ईशान किशन आणि मॉडेल अदिती हुंडिया यांच्या नात्याबद्दलही आजोबांनी मोकळेपणानं भाष्य केलं. "मी पाहिलं की मॅचनंतर अदिती ईशानला भेटत होती," असं सांगत त्यांनी या दोघांच्या नात्याला हिरवा कंदील दिला आहे. अदिती प्रत्येक मॅच पाहायला जाते, हे देखील त्यांनी आवर्जून नमूद केलं, ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

advertisement

लग्नाला आमची पूर्ण संमती असेल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, 3 कोटी उलाढाल
सर्व पहा

दरम्यान, कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल बोलताना अनुराग पांडे म्हणाले की, ईशानला ज्याच्याशी लग्न करायचं आहे, त्याला आमची पूर्ण संमती असेल. आम्ही त्याचा निर्णय स्वीकारू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका मोठ्या विजयानंतर खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातील या सकारात्मक चर्चांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ishan Kishan Gf : लाल ड्रेसवर नातवाची गर्लफ्रेंड व्हायरल झाली, इशानच्या आजोबांनी थेट लग्नाला दिला हिरवा कंदील! काय म्हणाले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल