Usha Nadkarni : 'आम्ही वेगळे झालो होतो पण नाडकर्णी परिवार...' वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलल्या आऊ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Usha Nadkarni on Marital Life : अभिनेत्री उषा नाडकर्णी पहिल्यांदाच त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर बोलल्या. त्यांच्या कुटुंबाविषयी आणि नाडकर्णी कुटुंबाविषयीही त्यांनी सांगितलं.
advertisement
1/7

मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका विश्वात गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयानं आणि कमाल व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. वयाच्या 80 व्या वर्षी देखील अभिनय क्षेत्रात सक्रीय त्या सक्रीय आहेत. नोकरी, संसार आणि अभिनय असा समतोल साधन त्यांनी अनेक वर्ष काम केलं.
advertisement
2/7
इंडस्ट्रीत त्यांना सगळे प्रेमानं आऊ म्हणून हाक मारतात. आऊ त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.
advertisement
3/7
पडद्यावर खाष्ट सासू असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या खूप प्रेमळ आहेत. आऊंच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार येऊन गेले. त्यांना एक मुलगा आहे. त्याच्याविषयी त्या अनेकदा बोलल्या आहेत. आऊ नवऱ्यापासून वेगळं राहतात याबद्दल देखील अनेक वर्ष चर्चा आहेत. पण त्यांनी कधीच त्यांच्या नवऱ्याविषयी फॅमिलीविषयी भाष्य केलं नव्हतं.
advertisement
4/7
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आऊंनी पहिल्यांदाच त्यांच्या नवऱ्याविषयी सांगितलं. राजश्री मराठीशी बोलताना उषा नाडकर्णी यांनी सांगितलं, "आम्ही चार भावंड, आई-पप्पा होते. माझं लग्न झालं बहीणचं झालं. धाकटा भाऊ पच्च्याहत्तरमध्ये गेला. माझं लग्न झालं मी वेगळी गेली. मग काही कारणांनी आम्ही वेगळे होतो. मी एकटी राहत होते."
advertisement
5/7
"नवऱ्याचं आणि माझं असं झालं होतं, पण नाडकर्णी परिवारात माझं कोणाशीही भांडण नाही. सगळ्यांच्या पार्ट्या, जेवणं मी माझ्या छोट्याश्या घरात केलेल्या आहेत. मी केलेलं जेवण सगळ्यांना आवडायचं."
advertisement
6/7
"पण ते जर बोलत नाही तर लीन होऊन कोणाकडे बोलायला जाणार नाही. मला काही गरज नाही. माझा देव आणि मी. माझ्या घरची माणसं आहेत. माझा भाऊ, मुलगा, बहिण होते माझ्याकडे."
advertisement
7/7
उषा नाडकर्णी या सध्या एकट्या राहतात. त्यांनी स्वत:चं खरं घेतलं मात्र त्या घरात त्या एकट्या राहतात. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्यापासून दूर राहत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांचं घट्ट नातं आहे. आऊंनी अनेकदा मुलाखतीमध्ये एकटेपणाची भीती वाटत असं सांगितलं होतं. रात्री स्वामींचं नाव घेते आणि झोपते असंही आऊंनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Usha Nadkarni : 'आम्ही वेगळे झालो होतो पण नाडकर्णी परिवार...' वैवाहिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलल्या आऊ