19 हजारांच्या EMIवर Maruti Brezza CNG खरेदी केल्यास किती भरावी लागेल डाउन पेमेंट?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Brezza CNG on EMI: भारतीय बाजारात मारुती ब्रेझा सीएनजी खुप प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहितीये का ही कार तुम्हाला दरमहा किती ईएमआयवर मिळेल? जाणून घेऊया हिशोब...
advertisement
1/6

तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत चांगलं मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर Maruti Brezza चा CNG व्हेरिएंट तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरु शकतो.
advertisement
2/6
Maruti Brezza CNG ची मागणी सतत वाढत आहे. तुम्हीही ही गाडी फूल पेमेंट न देता फायनेन्स करु इच्छित असाल तर किती डाउन पेमेंट भरावी लागेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
3/6
कारची ऑन-रोड किंमत किती? : LXi CNG व्हेरिएंटसाठी मारुती सुझुकी ब्रेझ्झा CNG ची सुरुवात 9.16 लाख रुपयां (एक्स-शोरूम) पासून होते. जेव्हा RTO फीस, इन्शुरन्स आणि इतर शुल्क समाविष्ट केले जातात, तेव्हा दिल्लीतील मारुती सुझुकी ब्रेझाची ऑन-रोड किंमत अंदाजे 10.23 लाख रुपये(एक्स-शोरूम) पर्यंत पोहोचते.
advertisement
4/6
दरमहा किती येईल EMI चा हिशोब? : तुम्ही ही कार खरेदी करताना 1 लाख रुपयांची डाउन पेमेंट केली तर तुम्हाला जवळपास 9.23 लाख रुपयांचं कार लोन घ्यावं लागले. समजा बँकेकडून हे लोन 9 टक्के वार्षिक व्याजदरावर 5 वर्षांसाठी मिळाले तर तुम्हाला दरमहा जवळपास 19 हजार रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.
advertisement
5/6
Maruti Brezza CNG पॉवरट्रेन : पॉवर आणि इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, ही मारुती सुझुकी एसयूव्ही 1.5-लिटर इंजिनने सुसज्ज आहे जी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शनमध्ये येते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे. पेट्रोल मोडमध्ये, हे इंजिन अंदाजे 99 bhp पॉवर आणि 136 Nm टॉर्क निर्माण करते.
advertisement
6/6
CNG मोडमध्ये याची पॉवर थोडी कमी होऊन जवळपास 86 bhp राहते आणि टॉर्क जवळपास 121.5 Nm मिळते. यामुळे ही कार अशा लोकांसाठी बेस्ट मानली जाते ज्यांना कमी खर्चात जास्त मायलेज असणारी एसयूव्ही खरेदी करायची आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
19 हजारांच्या EMIवर Maruti Brezza CNG खरेदी केल्यास किती भरावी लागेल डाउन पेमेंट?