मैदानावर गंभीर, पण पर्सनल लाइफमध्ये 'रोमिओ'! गर्लफ्रेंडसमोर ठेवली होती 'ही' अजब अट, गौतम-नताशाची हटके Love Story
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
गौतम गंभीर यांनी नताशा जैन यांच्यासोबत 28 ऑक्टोबर 2011 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची जर्नी अनेकांना माहिती नसेल.
advertisement
1/7

8 मार्च 2026 रोजी टीम इंडियाने तिसऱ्यांदा ICC T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या उत्तम कामगिरीबद्दल सर्वत्र सध्या त्यांची चर्चा आहे. सूर्यकुमार यादव च्या नेतृत्वाखाली भारताने तिसरा वर्ल्ड कप स्वतःच्या नावे केला. पण आज आपण याबद्दल चर्चा न करता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत.
advertisement
2/7
अनेकदा आपण गौतम गंभीर यांना खूप सिरीयस असताना पाहिलं आहे. बऱ्याचदा त्यांच्या नेहमीच सिरीयस राहण्याच्या भूमिकेवरून त्यांना ट्रोल केलं जात. पण अनेकांना गौतम गंभीर यांची रोमँटिक साईड माहिती नसेल.
advertisement
3/7
गौतम गंभीर यांनी नताशा जैन यांच्यासोबत 28 ऑक्टोबर 2011 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची जर्नी अनेकांना माहिती नसेल. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात पण मैदानाबाहेर गौतम गंभीर खूप वेगळा माणूस आहे.
advertisement
4/7
गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा जैन आहे, ती त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे. बिझनेसमन असलेल्या त्यांच्या वडिलांमुळे गौतम गंभीर आणि नताशाची एकमेकांशी ओळख झाली. मिडिया रिपोर्टनुसार, गंभीर आणि नताशाची पहिली भेट 2007 मध्ये झाली होती. एका मित्राच्या पार्टीमध्ये ते एकमेकांना भेटले होते.
advertisement
5/7
त्यावेळेस ते एकमेकांना डेट करत नव्हते, सुरुवातीला ते दोघे मित्र बनले, मग कालांतराने त्यांचं मैत्रीचं नातं प्रेमात बदललं. लग्नापर्यंत गोष्टी आल्या खऱ्या पण गंभीरने लग्नासाठी एक हटके अट ठेवली.
advertisement
6/7
गंभीरची अट अशी होती की तो 2011 चा एकदिवसीय विश्वचषक खेळल्यानंतरच लग्न करेल. या अटीला मान्य करून त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर त्यांच्या पालकांच्या संमतीने, 2011 मध्ये गुडगावमध्ये लग्न केले.
advertisement
7/7
गंभीरने एका मुलाखतीत ही अट उघड केली केली होती. अशी आगळीवेळी अट त्यांची देशासाठी खेळायची जिद्द उघड करते. ग्राउंडवर नेहमीच शांत, गंभीर, आणि सिरीयस दिसणारा गंभीर मैदानाबाहेर मात्र रोमिओ असल्याचं स्पष्ट होत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मैदानावर गंभीर, पण पर्सनल लाइफमध्ये 'रोमिओ'! गर्लफ्रेंडसमोर ठेवली होती 'ही' अजब अट, गौतम-नताशाची हटके Love Story