TRENDING:

'आम्हाला बनियान न घालण्याची मोकळीक, पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही', मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं जागतिक महिला दिनानिमित्तानं लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे पाहूया.
advertisement
1/7
'आम्हाला बनियान न घालण्याची मोकळीक, पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही'
नुकताच जागतिक महिला दिवस पार पडला. या दिवशी महिलांसाठी अनेक शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. पण एका मराठी अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना त्याने त्याच्या पोस्टमध्ये मांडली. अभिनेत्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
advertisement
2/7
'फुलपाखरू', 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता गौरव मालणकरने महिला दिनानिमित्तानं शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय.
advertisement
3/7
गौरवने पोस्टमध्ये लिहिलंय, "आम्हाला मासिक पाळीच्या वेदना कळणार नाहीत कधीच. आम्हाला लेबर पेन कळणार नाही कधीच, आम्हाला दिवस दिवस साडी नेसून, केसांना असंख्य पिना टोचून शूटींगला उभं राहण्याचं दु:ख कळणार नाही कधीच."
advertisement
4/7
"आमच्याकडे बनियान न घालण्याची मोकळीक आहे पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही कधीच ( भले ब्रेस्ट कॅन्सर चा आकडा कितीही वाढो आम्हाला काय त्याचं ) सबंध कपडे परिधान करून सुद्धा रस्त्यावरून चालताना तुमच्या अवयवांकडे निरखून बघणाऱ्या नजरा पचवण्याची ताकद आमच्यात येणार नाही कधीच."
advertisement
5/7
गौरवने पुढे लिहिलंय, "वर्किंग वुमन असलीस तरी so called संस्कारी राहण्याची पुरुषांनी थोपवलेली जबाबदारी आम्हाला पार पाडता येणार नाही कधीच, मी माइया बायको, प्रेयसीला पूर्ण स्वातंत्र्य देतो रे ह्यात सुद्धा एक मेल इगो आहे हे आम्हाला कळणार नाही कधीच."
advertisement
6/7
"असो जग कितीही काळाच्या पुढे जात असलं तरी तुमच्या वाट्याला येणारी संकट काही अंशी तशीच राहणार आहेत दुर्देवाने .. जग पुरुषप्रधान संस्कृतीतून लवकरात लवकर बाहेर पडो ह्या तुम्हाला महिलादिनी शुभेच्छा .. तुम्ही fighter आहात."
advertisement
7/7
अभिनेता गौरव मालणकर याने पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. फुलराणी या मराठी सिनेमात त्यानं काम केलं आहे. गौरव लेखक म्हणूनही काम करतो. कविता सादरि‍करणाचे अनेक कार्यक्रमही करत असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आम्हाला बनियान न घालण्याची मोकळीक, पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही', मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल