भीक मागते यार प्लीज! BBM 6 मधील सगळ्यात इमोशनल नॉमिनेशन टास्क; प्रत्येक सदस्य ओक्साबोक्सी रडला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Nomination : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क खूपच इमोशनल आहे. घरातील प्रत्येक सदस्याला या टास्कने रडवलं आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात दर आठवड्याला नॉमिनेशन टास्क होतात. घरातील सदस्य एकमेकांना नॉमिनेट करतात. प्रत्येक वेळी नॉमिनेशन करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क इमोशनल आहे, इतका की घरातील प्रत्येक सदस्य ओक्साबोक्सी रडला आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 मधील आताचं नॉमिनेशन अवलंबून आहे तर घरच्या पत्रावर. घरचं पत्र ठरवणार कोणता सदस्य नॉमिनेट होणार आणि कोण सेफ राहणार.
advertisement
3/7
प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता घरात एकमेकांच्या सोबत असलेल्या सदस्यांना एकमेकांच्या समोर उभं केलं आहे. त्यानंतर प्रत्येक सदस्य भावुक होतो, त्या पत्राशी संबंधित आणि घरच्यांशी संबंधित आठवणी सांगतो.
advertisement
4/7
तन्वी म्हणते, 'हे पत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे' विशाल सांगतो, 'माझे फक्त बाबाच आहेत' राकेश म्हणतो, 'आई झोपत नाही माझा आवाज ऐकल्याशिवाय'
advertisement
5/7
शेवटी अनुश्री खूप रडताना दिसते आहे. ती 'भीक मागते यार प्लीज. नाही यार नाही आईचं पत्र पाहिजे', असं म्हणते.
advertisement
6/7
एकंदर प्रोमो पाहिला तर यावरून प्रत्येक सदस्याकडे घरातील एका सदस्याचं पत्र असतं. आपलं पत्र समोरच्याकडून घेण्यासाठी सदस्यांना धडपड करावी लागते. त्यांनी पत्र द्यावं यासाठी त्यांच्याकडे विनवणी करावी लागते आहे.
advertisement
7/7
ज्याला पत्र मिळालं तो सेफ आणि ज्याला पत्र नाही मिळालं तो नॉमिनेट, असं एकंदर या प्रोमोतून दिसून येत आहे. आता नेमका हा टास्क कसा आहे हे एपिसोडमध्येच समजेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भीक मागते यार प्लीज! BBM 6 मधील सगळ्यात इमोशनल नॉमिनेशन टास्क; प्रत्येक सदस्य ओक्साबोक्सी रडला