TRENDING:

तुमच्या गावच्या ग्रामपंचयातीचा विकास आराखडा ऑनलाइन कसा पाहायचा? A TO Z माहिती

Last Updated:

Grampanchayat Vikas Aarakhada : ग्रामीण भागातील विकासकामे लोकांच्या सहभागातून ठरविण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने ‘ग्रामपंचायत विकास आराखडा’ (GPDP) ही संकल्पना पुढे आणली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ग्रामीण भागातील विकासकामे लोकांच्या सहभागातून ठरविण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने ‘ग्रामपंचायत विकास आराखडा’ (GPDP) ही संकल्पना पुढे आणली आहे. या आराखड्याच्या माध्यमातून गावातील आवश्यक विकासकामांचे नियोजन थेट ग्रामस्थांच्या सहभागातून केले जाते. कोणत्या कामांवर निधी खर्च करायचा याचा निर्णय ग्रामसभेत घेतला जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते.
Grampanchayat News
Grampanchayat News
advertisement

पंचायत राज संस्थांना घटनात्मक मान्यता

भारतीय संविधानातील ७३ व्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या संस्था स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा भाग बनल्या. मात्र अनेक वर्षे या संस्थांना पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे कठीण होत होते.

या पार्श्वभूमीवर १५ व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात आणि निश्चित कालावधीसाठी देण्यात येतो. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास ग्रामपंचायतींना स्थानिक स्तरावरील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

advertisement

ग्रामसभा ठरवते विकासकामे

ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना गावातील सर्व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायत प्रथम गावातील विविध गरजांची माहिती गोळा करते. त्यानंतर संबंधित योजनांमधील उपलब्ध निधीचा आढावा घेतला जातो. याला ‘रिसोर्स लिफाफा’ असेही म्हटले जाते, ज्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या निधीची माहिती दिलेली असते.

या आधारे ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा तयार करते आणि तो ग्रामसभेसमोर मांडला जातो. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा आराखडा अंतिम मानला जातो.

advertisement

ई-ग्राम स्वराज पोर्टलची सुविधा

पंचायती राज संस्थांमधील ई-गव्हर्नन्स मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-ग्राम स्वराज’ हे वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या विकास योजनांची माहिती, निधी वापर आणि प्रगती अहवाल नागरिकांना सहज पाहता येतो.

विकेंद्रित नियोजन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनाही त्यांच्या ग्रामपंचायतीने कोणती विकासकामे नियोजित केली आहेत याची माहिती मिळू शकते.

advertisement

विकास आराखडा ऑनलाईन कसा पाहायचा?

ग्रामपंचायत विकास आराखडा ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या ई-ग्राम स्वराज या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. त्यासाठी https://egramswaraj.gov.in या संकेतस्थळावर जावे.

वेबसाईट उघडल्यानंतर खाली स्क्रोल करून Reports या विभागात जावे. त्यानंतर Planning या पर्यायावर क्लिक करावे. पुढे Planning Report – Dashboard दिसेल. या ठिकाणी Approved Action Plan Report या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ज्या वर्षाचा विकास आराखडा पाहायचा आहे ते वर्ष निवडावे. कॅप्चा कोड भरून Get Report या बटणावर क्लिक केल्यावर पुढील माहिती उपलब्ध होते.

advertisement

राज्य, जिल्हा आणि गाव निवडून अहवाल पाहा

यानंतर आपल्या राज्याचे नाव शोधून त्यावर क्लिक करावे. पुढे Village Panchayat & Equivalent या विभागातील निळ्या रंगातील आकड्यावर क्लिक केल्यास जिल्हानिहाय माहिती दिसते.

यानंतर जिल्हा आणि तालुका निवडून Total Approved Plan Count या पर्यायावर क्लिक करावे. पुढे संबंधित ग्रामपंचायत किंवा गाव शोधून View Plan या पर्यायावर क्लिक केल्यास विकास आराखड्याची माहिती पाहता येते.

पीडीएफ स्वरूपात आराखडा डाउनलोड करा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत रमले नाही मन, तरुणाने सुरू केला भंगार गोळा करून व्यवसाय, 3 कोटी उलाढाल
सर्व पहा

या पोर्टलवरून ग्रामपंचायतीने अपलोड केलेला विकास आराखडा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येतो. या दस्तावेजामध्ये आराखड्याचा सारांश, विविध क्षेत्रांतील विकास योजना, प्राधान्यक्रमानुसार कामे आणि निधीचा तपशील दिलेला असतो.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुमच्या गावच्या ग्रामपंचयातीचा विकास आराखडा ऑनलाइन कसा पाहायचा? A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल