TRENDING:

OTT वरील सर्वात डिमांडिंग Series, 65 एपिसोड्स तरी कंटाळले नाहीत प्रेक्षक; 8 वर्षे झाली पाहतायेत, क्रेझ कायम

Last Updated:
OTT Trending Series : आतापर्यंतची ही अशी एकमेव सीरिज आहे, जिचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. आतापर्यंत अशी कोणतीच सीरिज आलेली नाही.
advertisement
1/7
OTT वरील सर्वात डिमांडिंग Series! 8 वर्षे , 65 एपिसोड्स तरी कंटाळले नाहीत लोक
तुम्ही ओटीटीवर बऱ्याच फिल्म, सीरिज पाहात असाल. काही सीरिज मोजक्यात एपिसोडच्या असतात. त्यांचा नंतर पुढचा सीझन येतो. पण काही वेळा एपिसोड्स किंवा सीझन जास्त झाले तरी ती सीरिज पाहायचा कंटाळा येतो. पण एक सीरिज ज्याची इतकी क्रेझ आहे की गेल्या 8 वर्षांत त्याचे 6 सीझन्स आले आहेत, तब्बल 65 एपिसोड्स प्रसारित झालेत तरी लोक कंटाळले नाहीत. तितक्याच आवडीने ते आजही पाहतात.
advertisement
2/7
ही ओटीटीची सर्वाधिक डिमांड असलेली सीरिज आहे. जिने सर्वाधिक मागणी असलेल्या टीव्ही शोचा दर्जा मिळवला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ही आतापर्यंतची एकमेव अशी मालिका आहे.
advertisement
3/7
मालिकेचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला. ज्यामध्ये एकूण 10 एपिसोड होते. यानंतर दुसरा सीझन 2019, तिसरा सीझन 2021, चौथा सीझन 2022, पाचवा सीझन 2024 साली प्रदर्शित झाला. सगळ्या सीझनचे प्रत्येकी 10 एपिसोड होते.
advertisement
4/7
2025 मध्ये मालिकेचा शेवटचा सहावा सीझन प्रदर्शित झाला ज्यात एकूण 15 एपिसोड आहेत. म्हणजे पहिल्या सीझनपासून ते शेवटच्या सहाव्या सीझनपर्यंत या मालिकेचे एकूण 65 एपिसोड्स आहेत.
advertisement
5/7
तरी त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. प्रत्येक सीझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.   या मालिकेची क्रेझ इतकी आहे की गेल्या आठ वर्षांपासून ती ओटीटीवर नंबर 1 ची आवडती मालिका आहे. या मालिकेचा प्रत्येक सीझन स्ट्रीम झाल्यानंतर अनेक महिने टॉप ट्रेंडिंग राहतो. तसंच सर्वात डिमांडिंग टीव्ही शोदेखील आहे.
advertisement
6/7
या मालिकेला त्याच्या लेखन, कामगिरी, अॅक्शन सीक्वेन्स, विनोद आणि व्यक्तिरेखा विकासासाठी समीक्षकांची प्रशंसा देखील मिळाली आहे. या मालिकेचे IMDb रेटिंग 8.4 आहे.
advertisement
7/7
ही मालिका नेटफ्लिक्स आणि युट्युबरही उपलब्ध आहे. मालिकेचं नाव आहे कोब्रा के. ही एक अमेरिकन मार्शल आर्ट्स कॉमेडी-ड्रामा टेलिव्हिजन मालिका आहे. जोश हॅरोल्ड यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT वरील सर्वात डिमांडिंग Series, 65 एपिसोड्स तरी कंटाळले नाहीत प्रेक्षक; 8 वर्षे झाली पाहतायेत, क्रेझ कायम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल