Today Horoscope: मंगळवारचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Today Horoscope: ग्रहांची आणि नक्षत्रांची चाल आपल्या आयुष्यावर काय परिणाम करेल, याची माहिती राशीभविष्यातून मिळते. राशीभविष्य व्यक्तीच्या भविष्य आणि वर्तमानाबद्दल माहिती देते. मंगळवारी मेष राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहण्याचा प्रयत्न करावा, तर वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक बाबींमध्ये सतर्क राहावे. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सविस्तर मंगळवारचे दैनिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/12

मेष - आज तुमचं सामाजिक जीवन खूप सक्रिय असेल. मित्र आणि घरच्यांसोबत वेळ घालवल्याने मनाला उभारी मिळेल. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडं जपून राहा, फिटनेकडे लक्ष दिलं तर दिवसभर उत्साह टिकून राहील. अधूनमधून थोडा आराम करायला विसरू नका. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा ठरेल.लकी नंबर: 7लकी कलर: लाल
advertisement
2/12
वृषभ - घरात आज आनंदी आनंद असेल. घरच्यांसोबत वेळ घालवणं सुरुवातीला थोडं जड वाटलं तरी त्याने मनाला शांती मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस एकदम कडक आहे. पैशांच्या बाबतीत मात्र हात आखडता घ्या, उधळपट्टी करू नका. नात्यात काही गैरसमज असतील तर ते बोलून सोडवा. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, त्याने मनाला समाधान मिळेल.लकी नंबर: 3लकी कलर: पांढरा
advertisement
3/12
मिथुन - आज तुमच्या डोक्यात नवीन आयडिया येतील, त्यावर नीट विचार करा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मिळून काम केलं तर मोठे यश नक्की मिळेल. तुमचं कसब आज एखाद्या महत्त्वाच्या कामात दिसून येईल. तब्येतीसाठी रोजचा व्यायाम आणि चांगला आहार ठेवा, त्याने आत्मविश्वास वाढेल. प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस लकी आहे; सिंगल असलेल्यांच्या आयुष्यात नवीन कोणीतरी येऊ शकतं.लकी नंबर: 5लकी कलर: नारंगी
advertisement
4/12
कर्क - आज कोणा खास मित्राचा किंवा घरच्या मोठ्या माणसाचा सल्ला तुमच्या कामाला येईल. व्यवसायात लोकांसोबत मिळून काम केल्याने फायदा होईल. तुमच्या नवीन कल्पनांचं कौतुक होईल. खर्चाच्या बाबतीत थोडा लगाम लावा आणि बचतीवर भर द्या. मानसिक शांतीसाठी थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. मनाचं ऐकून घेतलेले निर्णय आज तुम्हाला यश मिळवून देतील.लकी नंबर: 1लकी कलर: आकाशी निळा
advertisement
5/12
सिंह - एखादं नवीन काम हातात घेण्यासाठी आजचा दिवस भारी आहे. नात्यात गोडवा वाढेल, त्यामुळे जोडीदारासोबत वेळ घालवण्याची ओढ लागेल. घरच्यांशी बोलताना मनात काही ठेवू नका, स्पष्ट बोला. पैशांची गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या. आरोग्याची आबाळ करू नका, नियमित व्यायामाची सवय कायम ठेवा. तुमच्या ध्येयाकडे आज एकाग्रतेने वाटचाल करा.लकी नंबर: 12लकी कलर: काळा
advertisement
6/12
कन्या - घरच्यांशी किंवा मित्रांशी बोलून एखादा जुना प्रश्न आज सुटू शकतो. तुमच्या भावनांची काळजी घेतल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. जेवणाची आणि हलक्या व्यायामाची शिस्त पाळा. नवीन काहीतरी शिकण्याची किंवा करून पाहण्याची हीच ती वेळ आहे. सकारात्मक राहा आणि प्रगतीच्या ज्या संधी समोर येतील त्या ओळखा. आजचा दिवस तुम्हाला चांगले अनुभव देऊन जाईल.लकी नंबर: 5लकी कलर: हिरवा
advertisement
7/12
तूळ - नोकरी किंवा व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नका, सर्व बाजूंनी विचार करा. तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक थकवा घालवण्यासाठी योग किंवा ध्यान करा. सामाजिक कामात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. सकारात्मक राहिलात तर आज नवीन ऊर्जा मिळेल.लकी नंबर: 8लकी कलर: नेव्ही ब्लू
advertisement
8/12
वृश्चिक - कुणाशीही बोलताना शब्द जपून वापरा, विनाकारण वाद वाढवू नका. करिअरमध्ये नवीन काही करायचं असेल तर आजपासून कामाला लागा. तुमची मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि मनाला शांत ठेवा. आरोग्यासाठी थोडी धावपळ किंवा व्यायाम गरजेचा आहे. आज घेतलेला योग्य निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल.लकी नंबर: 6लकी कलर: ब्राऊन
advertisement
9/12
धनु - आज तुमच्या नात्यात प्रेम आणि एकमेकांबद्दलची ओढ वाढेल. कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे, तुमच्या छोट्याशा प्रयत्नाने घरातील वातावरण सुधारेल. तब्येतीसाठी योगासने गुणकारी ठरतील. आज चांगलं चुंगलं खा पण जिभेवर ताबा ठेवा. तुमची सकारात्मक वृत्ती बघून आजूबाजूचे लोक सुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेतील.लकी नंबर: 2लकी कलर: गडद हिरवा
advertisement
10/12
मकर - आज कोणाशीही बोलताना प्रामाणिक राहा, त्याने तुमची लोकांच्या नजरेतली किंमत वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी खबरदारी घ्या, व्यायाम आणि जेवण वेळेवर करा. मानसिक ताण घेऊ नका, त्यासाठी थोडी ध्यानधारणा करा. तुमच्या स्वप्नांच्या मागे लागायला आजचा दिवस चांगला आहे. मनातल्या भावना व्यक्त करा, त्याने तुमचं नातं अजून घट्ट होईल.लकी नंबर: 10लकी कलर: गुलाबी
advertisement
11/12
कुंभ - वैयक्तिक नात्यांच्या बाबतीत आजचा दिवस सकारात्मक आहे. जवळच्या माणसांसोबत वेळ घालवून तुम्हाला नवीन ताकद मिळेल. लोकांशी मिळून मिसळून वागल्याने तुमचे संबंध सुधारतील. व्यायामाची सवय लावा, त्याने शरीरासोबत मनही ताजेतवाने राईल. आज नवीन काहीतरी अनुभवण्याचा दिवस आहे. लोकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि तुमचे विचारही मोकळेपणाने मांडा.लकी नंबर: 9लकी कलर: जांभळा
advertisement
12/12
मीन - घरच्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्याने तुम्हाला आनंद मिळेल. नात्यात प्रामाणिकपणा ठेवा. ऑफिसमध्ये कामाचे डोंगर आले तरी ते आव्हान म्हणून स्वीकारा, तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला घाबरू नका, त्यानेच तुमची प्रगती होईल. मनाला शांत ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाका. आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल.लकी नंबर: 11लकी कलर: निळा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Today Horoscope: मंगळवारचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे दैनिक राशीभविष्य