अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये काही कामगार अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला दुपारच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर भीषण स्फोट झाला. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. आगीचा भडका इतका मोठा होता की, दूरपर्यंत आगीचे आणि धुराचे लोट दिसून येत आहे. या आगीमध्ये या केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या इतर कंपन्या देखील आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत.
advertisement
[video width="848" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-09-at-18.44.15-2026-03-9da4cec7f223e966545179a507b9ba94.mp4"][/video]
या केमिकल कंपनीमध्ये आग लागल्यानंतर एकापाठोपाठ भीषण असे स्फोट झाले आहे. दूरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. एवढंच नाहीतर स्फोटामुळे आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. कंपनीच्या परिसरात आग लागल्यानंतर कामगारांनी पळ काढला. या कंपनीच्या आजूबाजूलाा असलेल्या इतर कंपन्यांमधूनही कामगारांनी जीव मुठीत धरून घटनास्थळावरून सुरक्षित स्थळी पळ काढला. या केमिकल कंपनीमध्ये आग कशामुळे लागली, कुणी अडकलं आहे का, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ महापालिका, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीमध्ये काही कामगार आत अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
आग आटोक्यात
गणेश केमिकल नावाची कंपनी आहे. संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. केमिकल कंपनीच्या बाहेर एक टँकर उभा होता. केमिकल कंपनीमधून एक केमिकल रस्त्यावर आलं आणि आग लागली. या आगीत कंपनीबाहेर उभे असलेले ४ टँकर आगीच्या भक्षस्थानी सापडले. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. कंपनीमध्ये किती जण अडकले आहे, अजून काही माहिती समोर आली नाही. आतमध्ये कुणीही नव्हतं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण महापालिकेच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
