TRENDING:

Papmochani Ekadashi 2026: पापमोचनी एकादशीला देवी लक्ष्मीकडून सुख-समृद्धीचे वरदान! जर कराल ही 5 कामे

Last Updated:
Papmochani Ekadashi 2026: प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले जाते. दृक पंचांगानुसार, यावर्षी हे व्रत 15 मार्च रोजी असेल. फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल, तर या तिथीची समाप्ती 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी होईल. उदय तिथीचा विचार करता पापमोचनी एकादशीचे व्रत 15 मार्च रोजीच असेल.
advertisement
1/6
पापमोचनी एकादशीला देवी लक्ष्मीकडून सुख-समृद्धीचे वरदान! जर कराल ही 5 कामे
पापमोचनी एकादशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीलाही समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी मातेशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. पापमोचनी एकादशीला कोणते 5 उपाय केल्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
2/6
दक्षिणवर्ती शंखाने अभिषेक - पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक दक्षिणवर्ती शंखात दूध आणि जल भरून करा. अशी मान्यता आहे की माता लक्ष्मीचा शंखात वास असतो. या उपायामुळे घरातील दरिद्रता दूर होते आणि अडकलेले धन परत मिळते.
advertisement
3/6
माता लक्ष्मीला प्रिय फुले आणि नैवेद्य अर्पण - लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या चरणी दोन ताजी कमळाची फुले अर्पण करा आणि त्यांना खडीसाखर घातलेल्या केशर खिरीचा नैवेद्य दाखवा. पापमोचनी एकादशीला असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसायात प्रगतीचे योग येतात.
advertisement
4/6
तुळशीपाशी तुपाचा दिवा - पापमोचनी एकादशीला संध्याकाळच्या वेळी घरातील तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका आणि पानेही तोडू नका, फक्त दिवा लावून मनापासून प्रार्थना करा. असे केल्याने महालक्ष्मीचा घरात स्थायी वास होतो.
advertisement
5/6
विड्याच्या पानाचा उपाय - पापमोचनी एकादशीच्या दिवशी एका ताज्या विड्याच्या पानावर 'श्रीं' लिहून ते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. असे मानले जाते की हा उपाय धनाच्या आगमनाचे नवीन मार्ग उघडतो आणि उधळपट्टीवर लगाम लावतो.
advertisement
6/6
कवडी आणि केशर - शास्त्रांनुसार, पापमोचनी एकादशीला 5 पिवळ्या कवड्या केशरात भिजवून माता लक्ष्मीसमोर ठेवा आणि त्यांची पूजा करा. पूजेनंतर या कवड्या एका लाल कपड्यात बांधून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात, ज्या कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Papmochani Ekadashi 2026: पापमोचनी एकादशीला देवी लक्ष्मीकडून सुख-समृद्धीचे वरदान! जर कराल ही 5 कामे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल