Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, उष्णतेची लाट येणार, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
यावेळी विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसारख्या भागांत 39-41 अंशांपर्यंत तापमान नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
1/7

महाराष्ट्रात 9 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे, तर कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील, मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यात यावेळी उष्णतेचा पारा चढाच पाहायला मिळेल. यावेळी विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसारख्या भागांत 39-41 अंशांपर्यंत तापमान नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. सोमवारी देखील मुंबईसह, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात कमाल तापमान 32-35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश, किमान 18-21 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश, रात्री 19-22 अंश तापमान राहील. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-38 अंशांपर्यंत, किमान 20-23 अंश राहील. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 36-41 अंश, किमान 21-24 अंश राहील. अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, 9 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा तीव्र चटका जाणवत आहे. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, उष्णतेची लाट येणार, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट