TRENDING:

Suryakumar Yadav : टी-20 वर्ल्ड कप जिंकला आता पुढं काय? वनडे वर्ल्ड कप नाही तर सूर्यकुमारला जिंकायचीय पहिल्यांदाच खेळली जाणारी स्पर्धा!

Last Updated:

Suryakumar Yadav On next Target : सूर्याला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सूर्याने भन्नाट उत्तर दिलं. सूर्याला यावेळी तुझं आगामी लक्ष काय असणार आहे? असा सवाल विचारला गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India Win T20 World Cup 2026 Title : ज्या स्टेडियमला सर्वजण अनलकी म्हणत होते. तिथंच टीम इंडियाने इतिहास घडवून दाखवला आहे. टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप डिफेन्ड करणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे. टीम इंडियाने आक्रमक बॅटिंग करत 255 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची बॅटिंग ऑर्डर ढेपाळली. त्याचा फायदा टीम इंडियाला झाला. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलच्या अफलातून बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवलाय. अशातच आता सूर्यकुमार यादवने आगामी टार्गेटवर भाष्य केलंय.
Suryakumar Yadav said next goal is Olympics Gold medal
Suryakumar Yadav said next goal is Olympics Gold medal
advertisement

तुझं आगामी लक्ष्य काय?

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जंगी सेलीब्रेशन झालं. त्यानंतर कॅप्टन सूर्या आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेला उत्तरं दिली. गंभीरने यावेळी टीमच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला असून कॅप्टन सूर्याने देखील टीमच्या खेळाडूंचं कौतुक केलं. यावेळी सूर्याला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सूर्याने भन्नाट उत्तर दिलं. सूर्याला यावेळी तुझं आगामी लक्ष्य काय असणार आहे? असा सवाल विचारला गेला.

advertisement

वनडे वर्ल्ड कप नाही तर...

सूर्याला प्रश्न विचारल्यावर सर्वांना अपेक्षा होती की, तो वनडे वर्ल्ड कपचं नाव घेईल पण त्याने वेगळंच उत्तर दिलं. माझं आगामी लक्ष 2028 च्या ओलिम्पिक्समध्ये टीम इंडियासाठी गोल्ड मेडल मिळवायचं आहे. तसेच 2028 चा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप देखील जिंकायचा आहे, असंही कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला. शेजारी बसलेल्या गंभीरने देखील याला दाद दिली.

advertisement

विजयाचं श्रेय गंभीरला नाही तर राहुल द्रविडला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

दरम्यान, या प्रेस कॉन्फरेन्समध्ये सूर्यकुमार यादवचं एक वक्तव्य चर्चेत राहिलं. सूर्यकुमारने यावेळी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचं श्रेय गंभीरला नाही तर राहुल द्रविड यांना दिलं. यावेळी त्याने व्ही व्ही एस लक्ष्मण यांचा देखील उल्लेख केला. तर भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आपण महत्त्वाचे टप्पे साजरे करत आहोत. महत्त्वाचे टप्पे महत्त्वाचे नसतात, ट्रॉफी महत्त्वाच्या असतात. आपण ट्रॉफी साजरे करायला सुरुवात केली पाहिजे, असं गंभीर यावेळी म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : टी-20 वर्ल्ड कप जिंकला आता पुढं काय? वनडे वर्ल्ड कप नाही तर सूर्यकुमारला जिंकायचीय पहिल्यांदाच खेळली जाणारी स्पर्धा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल