Tips And Tricks : 'या' ट्रिक्स वापरून साठवा गूळ; उष्ण वातावरणातही वितळणार नाही, खराबही होणार नाही!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to store jaggery in summer : हल्ली बरेच लोक साखरेऐवजी गुळाला प्राधान्य देत आहेत. कारण पांढरी साखर आपल्यासाठी चांगली नसते, हे हल्ली सगळ्यांना पटत आहे. म्हणूनच लोक साखर सोडून गूळ वापरतात. पण हा गूळ सांभाळणं जरा अवघड असतं. कारण तो लवकर वितळण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते.
advertisement
1/7

गूळ व्यवस्थित सांभाळला नाही तर तो वितळतो, त्याला विचित्र वास येऊ शकतो किंवा तो खराबही होऊ शकतो. उन्हाळ्यात तर या समस्या आणखी जास्त वाढतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात गूळ साठवण्याच्या काही भन्नाट ट्रिक्स सांगत आहोत.
advertisement
2/7
गूळ नेहमी हवाबंद डब्यात साठवा, ज्यामुळे बाहेरची हवा आणि ओलावा आत जाणार नाही. काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर यासाठी सर्वात योग्य आहे. कारण ते कमी ओलावा आकर्षित करतात आणि तापमानाचा परिणाम कमी करतात.
advertisement
3/7
तुम्ही गूळ साठवण्यासाठी प्लास्टिक कंटेनर वापरल्यास त्यामध्ये अनेकदा वाफ तयार होण्याची शक्यता असते, ज्यामुळे गुळ लवकर मऊ होऊ शकतो. तसेच कंटेनर थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड, कोरड्या वातावरणात ठेवा.
advertisement
4/7
गूळ साठवण्यासाठी काही पारंपारिक घरगुती प्रभावी उपाय देखील आहेत. अनेक गृहिणी गुळाच्या डब्यात एक किंवा दोन तमालपत्रे ठेवतात, ज्यामुळे ओलावा कमी होतो आणि कीटक होण्याचा धोका कमी होतो. तसेच कोरडे तांदूळ स्वच्छ कपड्यात गुंडाळून कंटेनरमध्ये ठेवल्याने जास्त ओलावा शोषला जातो. ओलावा किंवा बुरशी वाढू नये यासाठी नेहमी गुळाचा डबा तपासात राहा.
advertisement
5/7
काही लोक उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमध्ये गुळ साठवतात, परंतु ही योग्य पद्धत नाही. रेफ्रिजरेटरमधून काढताना अचानक तापमानात बदल झाल्यामुळे गुळामध्ये वाफ तयार होऊ शकते, ज्यामुळे तो आणखी ओलसर होतो. गुळाचे लहान तुकडे करून ते स्वतंत्रपणे पॅक करणे चांगले. यामुळे गरजेनुसार कमी प्रमाणात वापरता येते. संपूर्ण कंटेनर वारंवार उघडण्याची गरज पडत नाही आणि ओलावा नियंत्रित राहतो.
advertisement
6/7
गुळ खरेदी करताना घट्ट, कोरडा आणि कमी आर्द्रता असलेला गूळ निवडा. कारण जास्त आर्द्रता असलेला गूळ उन्हाळ्यात लवकर वितळतो आणि खराब होण्याचा धोका वाढतो. रंग आणि पोतही पाहा. खूप चमकदार किंवा ओला गूळ टाळा. या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही उन्हाळ्यातही गूळ दीर्घकाळ साठवू शकता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : 'या' ट्रिक्स वापरून साठवा गूळ; उष्ण वातावरणातही वितळणार नाही, खराबही होणार नाही!