अभिनंदनाचा वर्षाव सुरू असतानाच कामठे यांना यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अजित पवार आज हवे होते. त्यांची मला खूप आठवण येतेय असे म्हणत राकेश कामटे भावुक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या.
मला दादांची खूप आठवण येतीये
राष्ट्रवादीने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याने कामठे सभागृहात येणार आहेत. पक्षाने संधी दिल्यावर पहिली प्रतिक्रिया विचारताच, "दादांची आठवण येतीय" असं म्हणत राकेश कामठे यांच्या भावनांचा बांध फुटला. पुणे महापालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली.
advertisement
पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. दत्तात्रेय धनकवडे आणि राकेश कामठे यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली.
कुणाकुणाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
पुणे महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने ८, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने दोन आणि काँग्रेस पक्षाने एकाला स्वीकृत नगरसेवकापदाची संधी दिली.
भारतीय जनता पक्ष- निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास नानावरे राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित, उदय लेले,
अजित पवार राष्ट्रवादी-दत्तात्रेय धनकवडे आणि राकेश कामठे
स्वीकृत नगरसेवक कसे निवडले जातात?
स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून जात नाहीत. महानगरपालिकेत राजकीय पक्षांच्या शिफारशीनुसार सभागृहात नामनिर्देशित केलेले सदस्य म्हणजे स्वीकृत नगरसेवक. स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या कामकाजात सहभागी होतात. पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ते सभागृहाच्या चर्चेत सहभागी होऊ शकतात.
