advertisement

AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?

Last Updated:

विशेष म्हणजे हे सर्व कोर्स पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

+
मोफत
title=मोफत कोर्स आणि प्लेसमेंट देणारा PCMC आणि कौशल्यम लाईटहाऊसचा उपक्रम

/>

मोफत कोर्स आणि प्लेसमेंट देणारा PCMC आणि कौशल्यम लाईटहाऊसचा उपक्रम

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कौशल्यम लाईट हाऊस यांच्या माध्यमातून 18 ते 35 वयोगटातील तरुणांसाठी विविध कौशल्याधारित कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या कोर्सेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्राफिक डिझायनिंग, डेटा मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, रिअल इस्टेट एक्झिक्युटिव्ह यांसारख्या अनेक कोर्सेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व कोर्स पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाबाबत कौशल्यम लाईट हाऊसच्या प्रेरणा जगताप यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
प्रेरणा जगताप यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कौशल्यम लाईट हाऊस यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, ब्युटी पार्लर, कॅफे मॅनेजमेंट, मोबाईल रिपेअरिंग, बँकिंग ऑफिसर, फॅशन डिझायनिंग अशा अनेक प्रकारचे कोर्स मोफत शिकण्याची संधी उपलब्ध आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 11 ठिकाणी या उपक्रमाची केंद्रे कार्यरत आहेत. पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, बोऱ्हाडेवाडी, बोपखेल, दापोडी, नेहरूनगर, किवळे आणि आकुर्डी तसेच इतर अनेक भागांमध्ये ही केंद्रे आहेत. इच्छुक उमेदवारांना सोयीस्कर असलेल्या कोणत्याही केंद्रावर जाऊन कोर्स करता येतो. हे सर्व कोर्सेस विनामूल्य आहेत.
advertisement
कुठे नावनोंदणी करायची?
पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, बोऱ्हाडेवाडी, बोपखेल, दापोडी, नेहरूनगर, किवळे आणि आकुर्डी अशा अनेक ठिकाणी कौशल्यम लाईट हाऊसची केंद्रे सुरू आहेत. इच्छुक तरुणांना जवळच्या कोणत्याही केंद्रावर जाऊन नावनोंदणी करता येते. अधिक माहितीसाठी 1800 202 0110 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा kaushalyam@lighthousecommunities.org या ईमेलवरही माहिती मिळू शकते.
advertisement
कौशल्यम लाईट हाऊस या उपक्रमाच्या माध्यमातून 2024-25 या कालावधीत तब्बल 1,204 तरुणांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील तरुणांच्या करिअर घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement