TRENDING:

जळगाव पोलीस पेट्रोल पंप अपहार प्रकरण: फरार PSI वाल्मिक वाघ पोलिसांना शरण

Last Updated:

जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंप अपहार प्रकरणातील फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याच्यावर १ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहाराचा आरोप आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील अपहार प्रकरणात फरार असलेले पेट्रोलपंप व्यवस्थापक तथा पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांसमोर शरण आले.
जळगाव-फरार पीएसआय वाल्मिक वाघ पोलिसांना शरण
जळगाव-फरार पीएसआय वाल्मिक वाघ पोलिसांना शरण
advertisement

पोलिसांनी त्यांच्यासह त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक केली आहे. पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. तपासात त्यांनी सुमारे १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते.

अपहार समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वाघ यांनी चौकशीत इतक्या मोठ्या रकमेचा नव्हे तर केवळ १० ते १५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून अपहाराची रक्कम नेमकी किती आणि ती कशाप्रकारे वापरली याबाबत सखोल तपास सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नेहमीच्या पिकांपेक्षा नवा प्रयोग, खर्चही आला कमी, वर्षाला 5 लाखांची कमाई फिक्स!
सर्व पहा

वाघ पिता-पुत्राला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अपहाराची रक्कम नेमकी किती आणि कुठे खर्च केली, याबाबतची चौकशी पोलीस कोठडीत होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगाव पोलीस पेट्रोल पंप अपहार प्रकरण: फरार PSI वाल्मिक वाघ पोलिसांना शरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल