TRENDING:

"बेडरूममध्ये जे पाहिलं ते..." पत्नीने मंत्र्याला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं, राजकारणात खळबळ

Last Updated:
बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत पत्नीने रंगेहात पकडलं, 5000 लफडी असल्याचं मंत्र्‍यानेच सांगितलं रागात सांगितलं, त्यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
1/8
"बेडरूममध्ये जे पाहिलं ते..." पत्नीने मंत्र्याला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं
राजकारणात सध्या एका मंत्र्याच्या बेडरूममधील लाईव्ह ड्रामाने राजकीय धुरळा उडवून दिला आहे. केरळ काँग्रेस पक्ष (बी) केरळचे वाहतूक मंत्री के. बी. गणेश कुमार यांना त्यांच्या पत्नीनेच एका परक्या महिलेसोबत 'रंगेहात' पकडल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली.
advertisement
2/8
हा प्रकार इतका टोकाला गेला की, मंत्र्यांच्या माणसांनी स्वतःच्याच मालकिणीला धक्काबुक्की केली आणि पोलिसांना घराचा उंबराही ओलांडू दिला नाही! "दोन महिने मी बाहेर होते, पतीने माझा नंबर ब्लॉक केला होता.
advertisement
3/8
काय चाललंय हे बघायला मी पतीला न कळवताच अचानक घरी पोहोचले आणि जे पाहिलं त्याने पाय खालची जमीनच सरकली," अशा शब्दांत पत्नी बिंदू मेनन यांनी आपला संताप व्यक्त केला.
advertisement
4/8
बेडरूममध्ये पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर बिंदू यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उपस्थित असलेल्या बॉडीगार्ड्सनी त्यांचा फोन हिसकावून घेतला. इतकंच नाही, तर पोलिसांना बोलावूनही मंत्र्यांच्या 'पंटर' लोकांनी त्यांना घरात शिरूच दिलं नाही!
advertisement
5/8
साधारणपणे असे आरोप झाले की मंत्री हात जोडून माफी मागतात किंवा नकार देतात. पण गणेश कुमार यांनी तर कहरच केला! पत्नीच्या आरोपांवर ते म्हणाले, "माझं एक नाही, ५ हजार प्रेमप्रकरणं आहेत! ज्यांची प्रेमप्रकरणं नसतात ना, ते मूर्ख असतात.
advertisement
6/8
" इतक्यावरच न थांबता त्यांनी स्वतःची तुलना थेट महात्मा गांधी आणि नेहरूंशी करून टाकली. "प्रेम कसं असतं हे मी नंतर निवांत समजावून सांगेन," असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची अक्षरशः टर उडवली.
advertisement
7/8
यापूर्वी देखील हे मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मात्र यावेळचे आरोप जरा जास्तच गंभीर आहेत. त्यामुळे यावेळी त्यांच्या कृतीमुळे पक्षच धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे. २०१३ मध्ये पहिली पत्नी यामिनीने मारहाणीचे आरोप केले होते, तेव्हा त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं.
advertisement
8/8
आता दुसऱ्या पत्नीनेही त्यांच्या 'कॅरेक्टर'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे विरोधकांनी रान पेटवलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर '५ हजार लफड्यांचा' हा विषय आता केरळच्या डाव्या सरकारला महागात पडणार असं दिसतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
"बेडरूममध्ये जे पाहिलं ते..." पत्नीने मंत्र्याला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं, राजकारणात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल