TRENDING:

AC च्या स्फोटात महिलेचा मृत्यू! जाणून घ्या ब्लास्टचे संकेत, कसा करावा बचाव

Last Updated:
ग्वालियरमध्ये 8 मार्च 2026 रोजी एसी चालू करताच कंप्रेसर ब्लास्ट झाल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कसा होतो आणि होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/9
AC च्या स्फोटात महिलेचा मृत्यू! जाणून घ्या ब्लास्टचे संकेत, कसा करावा बचाव
ग्वालियरमध्ये 8 मार्च 2026 ला एक भयानक घटना घडली. येथे एसी चालू करताच कंप्रेसरमध्ये ब्लास्ट झाला. यामुळे घरात ठेवलेला गॅस सिलेंडर लीक झाला आणि तिन मजली इमारतीला आग लागली. या अपघातात अंकिता अग्रवाल नावाच्या महिलेचा धुरात गुदमरुन मृत्यू झाला आहे.
advertisement
2/9
कुटुंबातील दोन लहान मुलं आणि दुसरे सदस्य अडकले होते. मात्र SDRF ने त्यांना वाचवले. अग्निशमन दल, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि लष्कराच्या पथकांनी तीन तासांहून अधिक काळाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. ही घटना एसी स्फोट किती धोकादायक असू शकतात हे अधोरेखित करते, विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा एसी दिवसरात्र चालू असतात. एसीची कशी काळजी घ्यायला हवी पाहूया.
advertisement
3/9
AC का ब्लास्ट होतात? : मुख्य कारण म्हणजे कंप्रेसरच्या आत जास्त दाब जमा होणे. जेव्हा एसी चालू केला जातो तेव्हा कंप्रेसर गॅस (रेफ्रिजरंट) दाबतो. काही बिघाड झाला तर स्फोट होऊ शकतो. सामान्य कारणे काय आहेत पाहूया.
advertisement
4/9
ओव्हरहिटिंग : उन्हाळ्यात AC सतत चालवल्याने खराब व्हेंटिलेशन किंवा खराब फिल्टर/कॉइलने कंप्रेसर जास्त गरम होते. यामुळे प्रेशर वाढते. यासोबतच सर्व्हिगिंस न करणे : वर्षातून एक-दोनवेळा सर्व्हिस न केल्याने धूळ जमा होते. एयर फ्लो ब्लॉक होतो आणि कंप्रेसरवर जास्त लोड पडतो.
advertisement
5/9
फॉल्टी वायरिंग किंवा इंस्टॉलेशन : चुकीची वायरिंग, पॉवर सर्ज, व्होल्टेज फ्लक्चुएशन किंवा जुन्या वायरिंगमुळे शॉर्ट सर्टिक होऊ शकते. ज्यामुळे स्पार्ट निर्माण होऊ शकते. यासोबतच रेफ्रिजरेंट लीक किंवा चुकीचा गॅस : काही रेफ्रिजरेंज (जसंR32, R290) फ्लेमेबल असतात. लीक झाल्यावर स्पार्कने आग लागू शकते. इतर कारणांविषयी बोलायचं झाल्यास जास्त लोड, चुकीचे टेम्परेचर सेटिंग कुंवा जुना एसी ही कारणं असू शकतात.
advertisement
6/9
ग्वाल्हेर घटनेत, AC कॉम्प्रेसर चालू असताना स्फोट झाला, ज्यामुळे गॅस सिलिंडर गळती झाली आणि आग लागली. लोक योग्य सेवेशिवाय एसी चालवत असल्याने असे अपघात वाढत आहेत.
advertisement
7/9
यापासून सुरक्षित कसं राहावं? : दर 6 महिन्यात सर्व्हिस करुन घ्या. फिल्टर, कॉइल स्वच्छ ठेवा. फक्त सर्टिफाइड टेक्निशियनकडून इंस्टॉलेशन करा. वायरिंग चेक करा, स्टेबलायजरचा वापर करा. ओव्हरयूज टाळा, म्हणजेच रात्रभर चालवणं टाळा. 24-26 डिग्रीवर सेट करा. जास्त गार ठेवू नका.
advertisement
8/9
गॅस लीकेज तपासा, एसीजवळ गॅस सिलिंडर ठेवू नका. स्मोक डिटेक्टर लावा.संकेतांवर लक्ष द्या. जसं की, विचित्र आवजा, जास्त गरम होणे, दुर्गंधी किंवा कमी कुलिंग असेल तर लगेच बंद करा आणि सर्व्हिस बोलवा.
advertisement
9/9
एसीचा स्फोट रोखणे सोपे आहे - फक्त काही खबरदारी घ्या. उन्हाळ्यात एसी आवश्यक असतात, परंतु सुरक्षित वापरामुळे जीव वाचू शकतात. तुम्हाला तुमच्या एसीमध्ये काही समस्या आढळल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
AC च्या स्फोटात महिलेचा मृत्यू! जाणून घ्या ब्लास्टचे संकेत, कसा करावा बचाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल