T20 वर्ल्ड कप जिंकताच BCCI ने पेटारा उघडला! टीम इंडियाला तब्बल 131 कोटींचं बक्षिस जाहीर, संजूला किती मिळणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI announces 131cr cash prize : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 च्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विजयी मोहिमेनंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
advertisement
1/8

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून ववर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने सलग दुसरी ट्रॉफी नावावर केल्याने बीसीसीआय खेळाडूंच्या कामगिरीवर खुश आहे.
advertisement
2/8
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 च्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विजयी मोहिमेनंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
advertisement
3/8
बीसीसीआयचे सचिव देवजित साकरिया यांनी याची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना हे बक्षिस मिळणार आहे. त्यामुळे बक्षिसाची रक्कम समसमान वाटली जाईल.
advertisement
4/8
टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला 6 ते 7 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सूर्यासह संजूला देखील समान रक्कम मिळेल.
advertisement
5/8
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोर्ड खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देतो, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
advertisement
6/8
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी 2024 मध्ये टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. आता 6 कोटी अधिक दिले गेले आहेत.
advertisement
7/8
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली आणि आयसीसी T20 विश्वचषक कायम ठेवणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला, असंही बीसीसीआयने म्हटलं.
advertisement
8/8
दरम्यान, टीम इंडियाच्या विजयासह, भारत तीन वेळा आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आणि या स्वरूपाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कप जिंकताच BCCI ने पेटारा उघडला! टीम इंडियाला तब्बल 131 कोटींचं बक्षिस जाहीर, संजूला किती मिळणार?