TRENDING:

Weather Alert : 'सूर्या'ची नजर फक्त महाराष्ट्रावर, पारा 'फुटणार', 14 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
महाराष्ट्रात 10 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
'सूर्या'ची नजर फक्त महाराष्ट्रावर, पारा 'फुटणार', 14 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात 10 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात तापमान 37-41 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल 34-38 अंश सेल्सियस तर किमान 22-26 अंश राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुरात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल 35-38 अंश, किमान 18-21 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये दिवसा 34-37 अंश राहील. जळगाव आणि अहिल्यानगरला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 35-39 अंशांपर्यंत, किमान 20-23 अंश राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणीला उष्णतेचा यलो असेल.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता राहील. कमाल 36-41 अंश, किमान 21-24 अंश राहील. अमरावती, अकोला आणि वर्ध्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
7/7
एकंदरीत, 10 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता जाणवेल. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : 'सूर्या'ची नजर फक्त महाराष्ट्रावर, पारा 'फुटणार', 14 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल