Thane News : ठाणेकरांना मिळणार नव्या 360 बसेस, प्रवाशांच्या सेवेमध्ये कधीपर्यंत होणार सामील?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ठाणे शहरातील परिवहन विभागाने मार्च 2027 पर्यंत बसेसच्या सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरातील बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरण पूरक प्रवास करायला मिळणार आहे.
advertisement
1/6

मुंबईसह उपनगरांमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर बसचा वापर करत असतात. विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मंडळी बसचा वापर करत असतात. ठाणेकरांच्यादृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. ठाणेकरांचा प्रवास आता आणखीनच गारेगार आणि आरामदायी होणार आहे.
advertisement
2/6
ठाणे शहरातील परिवहन विभागाने बसेस संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षापर्यंत परिवहन विभागाच्या बसेसच्या ताफ्यांमध्ये बऱ्याच सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रदूषण कमी होण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/6
ठाणेकरांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूक देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च 2027 पर्यंत सार्वजनिक वाहतूक पुरवणाऱ्या बसेस एकूण 360 नवीन बसेस दाखल करण्याची योजना आखण्यात आली आहे.
advertisement
4/6
सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीसाठी ठाण्याच्या परिवहन विभागाच्या बसेसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसचा समावेश केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान अंतर्गत यापूर्वीच ठाणे परिवहन सेवेत 123 इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहेत.
advertisement
5/6
त्या इलेक्ट्रिक बसेसमुळे ठाणेकरांना आरामदायी प्रवासासोबत प्रदूषण मुक्त वाहतुकीचा लाभ मिळत आहे. मार्च 2027 पर्यंत ठाण्याच्या परिवहन विभागाकडून वेगवेगळ्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. शिवाय, सध्या 15 वर्षे जुन्या असलेल्या बसेसला भंगारात काढले जाणार आहे. डिझेलच्या वापरातील बसेस लवकरात लवकर भंगारात काढल्या जाणार आहेत.
advertisement
6/6
2026- 27 मध्ये, पीएमई योजनेंतर्गत 100 इलेक्ट्रिक बस, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 160 बस आणि महापालिकेच्या परिवहन विभागाकडून 100 सीएनजी बस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशा पद्धतीने एकूण 360 बसेस परिवहन विभागाच्या बसेसच्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत. या नव्या बसेसमुळे सहाजिकच ठाणेकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Thane News : ठाणेकरांना मिळणार नव्या 360 बसेस, प्रवाशांच्या सेवेमध्ये कधीपर्यंत होणार सामील?