'हौंसला-ईंधन-बदला' चा अर्थ काय? Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्येच दडलेत 5 मोठे सीक्रेट्स, 90% लोकांना माहीत नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 हा केवळ एक स्पाय थ्रिलर नाही, तर यात मानवी भावना, इतिहास आणि सूडाचं असं एक कॉकटेल आहे जो पहिल्या फटक्यात समजणं कठीण आहे. या ३ मिनिटांच्या ट्रेलरमधून समोर आलेले ५ धक्केदायक खुलासे तुम्हाला थक्क करतील.
advertisement
1/9

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि इंटरनेटवर जणू वादळच आलं. रणवीर सिंगच्या डोळ्यांतील तो खुन्नस पाहून अंगावर काटा येतो. पण हा केवळ एक स्पाय थ्रिलर नाही, तर यात मानवी भावना, इतिहास आणि सूडाचं असं एक कॉकटेल आहे जो पहिल्या फटक्यात समजणं कठीण आहे. या ३ मिनिटांच्या ट्रेलरमधून समोर आलेले ५ धक्केदायक खुलासे तुम्हाला थक्क करतील.
advertisement
2/9
पहिल्या भागात आपण ज्याला 'हमजा' म्हणून पाहिलं, त्याचं खरं नाव जसकीरत सिंह रंगी असल्याचं ट्रेलरमध्ये स्पष्ट होतंय. तो भारतीय लष्करात जवान होता. पण त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं की त्याला बंदूक सोडावी लागली.
advertisement
3/9
ट्रेलरमधील एका सीनमध्ये तो थरथर कापत असताना दिसतो, जो त्याच्या मानसिक धक्क्याचा पुरावा आहे. बैसाखीच्या सणादिवशी त्याच्या आई-वडील आणि बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्याने शस्त्र उचललं आणि तिथूनच त्याचा 'धुरंधर' बनण्याचा प्रवास सुरू झाला.
advertisement
4/9
ट्रेलरमध्ये जसकीरतच्या पास्ट लाइफमधील काही दृश्यं अतिशय अस्वस्थ करणारी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, १९८४ च्या शिख दंग्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या वडिलांची हत्या झाली असावी. क्रेडिट्समध्ये 'हरलीन रंगी' हे नाव दिसतंय, जी जसकीरतची बहीण आहे.
advertisement
5/9
तिच्यासोबत झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जसकीरतने रक्ताची होळी खेळली. अजय सान्याल (आर. माधवन) जेव्हा त्याला भेटतो, तेव्हा त्याचं पहिलं वाक्य असतं, "घायल हो, इसलिए घातक हो!"
advertisement
6/9
रहमान डकैतच्या मुलाला आणि कुटुंबाला ज्या पद्धतीने हमजाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यामागे एक मोठं ट्रेनिंग होतं. ट्रेलरच्या क्रेडिट्समध्ये उर्दू, इतिहास आणि ड्रामा टीचरचे नाव आहे. याचा अर्थ, हमजाला केवळ लढायला नाही, तर अभिनय करायलाही शिकवलं गेलं होतं. म्हणूनच तो पाकिस्तानात जाऊन कोणालाही संशय न येता वावरू शकला.
advertisement
7/9
रहमान डकैतच्या मुलाचा मृत्यू, रहमान डकैतचा मृत्यूनंतर हमजा जो ड्रामा करतो, फेक इमोशन्स दाखवतो, एलनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, हे सर्व तो या ट्रेनिंगमुळेच करू शकला.
advertisement
8/9
ट्रेलरमध्ये 'रेड कलर'ची थीम वारंवार दिसते, जी सूडाचे प्रतीक आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या ल्यारी भागात उजैर बलोच आणि अरशद पप्पू यांच्यात सुरू झालेलं गँगवॉर यात दिसणार आहे. वास्तविक आयुष्यात २०१३ मध्ये उजैर बलोचने अरशद पप्पूचं शिर कापून त्याच्याशी फुटबॉल खेळल्याची भयानक घटना घडली होती, त्याचा संदर्भ या चित्रपटात दिला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
9/9
ट्रेलरमध्ये पांढरा पठानी कुर्ता आणि हातात सिगारेट घेतलेला एक करारी अधिकारी दिसतो, तो म्हणजे चौधऱी असलम. ज्यांनी खऱ्या आयुष्यात २००९ मध्ये रहमान डकैतचा एनकाउंटर केला होता. २०१४ मध्ये ल्यारी एक्सप्रेसवेवर एका कार बॉम्ब स्फोटात त्यांची हत्या झाली होती. 'धुरंधर २' मध्ये या खऱ्या घटनांचा वापर करून फिक्शनची अशी काही गुंफण केलीय की प्रेक्षकांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'हौंसला-ईंधन-बदला' चा अर्थ काय? Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्येच दडलेत 5 मोठे सीक्रेट्स, 90% लोकांना माहीत नाही